लठ्ठपणा कमी करण्यासाठी केली जाणारी बेरियाट्रीक सर्जरी केवळ वाढलेली चरबी कमी करण्याचं काम करत नाही. तर जे लोक सर्जरी करतात, त्यांना स्किन कॅन्सर होण्याचा धोकाही कमी असतो. यात मेलानोमाचाही समावेश आहे. मलानोमा त्या स्थितीला म्हणतात, ज्यात स्किनला रंग देणाऱ्या सेल्समध्ये कॅन्सर वाढतो. हा रिसर्च JAMA Dermatology मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

(Image Credit : dailymail.co.uk)

स्वीडनच्या गोथेनबर्ग विश्वविद्यालयातून पीएचडी झालेले मॅग्डेलेना टूबने त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून स्किन कॅन्सर आणि मेलेनोमावर बेरियाट्रीक सर्जरीचा प्रभाव आणि लठ्ठपणावर नियंत्रण याबाबत रिसर्च केला. या रिसर्चमध्ये या आजारांशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये त्या रूग्णांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी बेरियाट्रीक सर्जरी केली होती. या रूग्णांची संख्या २ हजार ४० होती.

अभ्यासकांना त्याच्या रिसर्चदरम्यान आढळलं की, जे रूग्ण बेरियाट्रीक सर्जरी करतात, त्यांच्यात स्किन कॅन्सर आणि मेलानोमा होण्याचा धोका कमी होतो. ही सर्जरी थेट स्किन कॅन्सर होण्याच्या शक्यतेला नष्ट करते. स्किन कॅन्सरचा धोका होण्याचा आधार बॉडी मास इंडेक्स किंवा सर्जरीनंतर वजन कमी होणं हा नव्हतं. तसेच इन्सुलिन, ग्लूकोज, लिपिड आणि क्रिएटिनिन स्तर, डायबिटीस, ब्लड प्रेशर, मद्यसेवन किंवा धुम्रपानाशी याचा संबंध नव्हता.

रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, या निष्कर्षातून हे कळालं की, बेरियाट्रीक सर्जरीनंतर लठ्ठपणासोबत रूग्णांमध्ये मेलेनोमाच्या घटनांमध्येही घट होते. ज्यामुळे स्किन कॅन्सरचा धोका कमी होतो. असं असलं तरी या दिशेने आणखी काम करणं बाकी आहे. जगभरात लठ्ठपणाचा आजार ज्याप्रकारे वाढत आहे, त्यानुसार इतर अनेक आजारही लोकांना होऊ शकतात. 

Web Title: Bariatric surgery linked to reduced risk for skin cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.