दुधीच्या रसाचे धोके सांगतेय खुद्द ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मान खुरानाची पत्नी, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:42 PM2021-10-13T16:42:32+5:302021-10-13T16:57:16+5:30

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

ayushmann khurrana's wife Tahira Kashyap shares bottle gourd juice awareness video on Instagram after recovery | दुधीच्या रसाचे धोके सांगतेय खुद्द ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मान खुरानाची पत्नी, शेअर केला व्हिडिओ

दुधीच्या रसाचे धोके सांगतेय खुद्द ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मान खुरानाची पत्नी, शेअर केला व्हिडिओ

Next

अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच आयसीयु ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताहिराला दुधी भोपळ्यामुळे फूड पॉयझींनिंग झालं होतं. ताहिराने देखील वेळेत उपचार घेतल्याने ती आता ठणठणीत आहे. यानंतर आता ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

दुधी भोपळ खाण्यायोग्य की आयोग्य कसा ओळखायचा ?
दुधी, काकडी, भोपळा अशा भाज्यांचा आहारात थेट समावेश करण्यापूर्वी त्याचा लहानसा तुकडा चावून बघणे गरजेचे आहे. भाजीचा तुकडा कडवट चवीचा जाणवल्यास त्याचा आहारात समावेश करणं टाळा. वरून भोपळा ओळखणे शक्य नसते त्यावेळी हा उपाय चांगला आहे. तसेच प्रामुख्याने दूधी भोपळ्यासारख्या फळभाज्या नीट शिजवून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहेत. यासोबत बाजारात मिळणारा विकतचा रस पिणं टाळा कारण तो कधी बनवला आहे याची माहिती नसते. त्याऐवजी घरच्या घरी ताजा रस बनवून प्यावा. मात्र हे सर्व करण्यापूर्वी चव तपासून पाहायला विसरू नका.

विषारी दुधी भोपळ्याची लक्षणे काय आहेत ?
विषारी दुधी भोपळ्याचा रस पोटात गेल्यास अवघ्या काही मिनिटात उलटी, डायरीया, खूप प्रमाणात घाम येणे, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं आढळतात. या लक्षणांनंतर रूग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे आहे. अशाप्रकारच्या विषारी घटकांच्या उतारावर ठोस औषध नसल्याने जगभरात अशाप्रकारे विषारी घटक पोटात जाणं हे काही मिनिटात जीववर बेतण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूग्णालयात वेळेत जाणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

दुधी भोपळ्याचा रस कधी ठरतो घातक आणि कशामुळे?
प्रत्येक दुधी भोपळ्याचा रस हा जीवघेणा नसतो. मात्र दुधी ही फळभाजी Cucurbitaceae प्रकारातील असते. जेव्हा फळभाजीमध्ये cucurbitacin हे विषारी द्रव्य वाढते तेव्हा त्याची चव बदलते. कडवट बीयांमुळेही हे फळ कडू होते. अशाप्रकारची भाजी थेट शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. दुधीप्रमाणेच या वर्गतील इतर फळभांज्याच्या बाबतीत देखील हे घडू शकते. त्यामुळे या फळभाजीपैकी कोणतेही भाजी घेताना त्याची चव घेणे गरजेचे आहे.

Web Title: ayushmann khurrana's wife Tahira Kashyap shares bottle gourd juice awareness video on Instagram after recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.