Health Tips : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या वेळा यामुळे आजकाल अनेकांना गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर, पोट फुगणं अशा वेगवेगळ्या समस्यांचा नेहमीच सामना करावा लागतो. पचन तंत्र बिघडलं की, या समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधंही घेतात. पण नेहमी घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे इतरही काही समस्या होण्याचा धोका असतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करणं अधिक फायदेशीर ठरत असतं.
आयुर्वेद डॉक्टर रोबिन शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर असाच एक घरगुती उपाय सांगितला आहे. एका व्यक्तीनं त्यांना गॅसची समस्या दूर करण्यासाठी उपाय विचारला होता. डॉक्टरांना या व्यक्तीला जीरं, बडीशेप आणि ओव्याचा एक उपाय सांगितला होता. हा उपाय व्यक्तीची गॅसची जुनी समस्या लगेच दूर झाली होती. जर तुम्हालाही नेहमीच गॅसची समस्या होत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.
डॉक्टर म्हणाले की, आजकाल बऱ्याच लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांना गॅसची समस्या होते आणि आंबट ढेकरही येतात. हे पोटात अन्न पचन होत नसल्याचं लक्षण आहे.
कसा कराल उपाय?
२५ ग्रॅम जीरं, २५ ग्रॅम बडीशेप, ५० ग्रॅम ओवा २५ ग्रॅम सैंधव मीठ घ्या. तव्यावर या सगळ्यात गोष्टी गरम करा. नंतर मिक्सरमधून त्याचं पावडर तयार करा. त्यात २५ ग्रॅम मीठ मिक्स करा.
अपचन, गॅस, ढेकर आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी अर्धा चमचा पावडर एक ग्लास गरम पाण्यात टाकून पिऊ शकता. तुम्ही हे पावडर ताकासोबतही घेऊ शकता.