Cough Home Remedies : अनेक लोकांना कफाची फार जुनी समस्या असते. या लोकांच्या छातीमध्ये कफ जमा झालेला असतो. ज्यामुळे त्यांना नेहमीच खोकला आणि श्वास घेण्याची समस्या होते. जर तुम्हाला दम्याची समस्या असेल, श्वास घेण्यास नेहमीच अडचण होत असेल, तर तुम्हाला लगेच आराम देणारा एक आयुर्वेदिक उपाय आम्ही सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही मोकळेपणानं श्वास घेऊ शकाल आणि जुन्या छातीत जमा जुना कफही बाहेर पडेल.
फुप्फुसांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी कफ जमा होऊ लागतो. याची मुख्य कारणं इन्फेक्शन, एलर्जी किंवा आरोग्यासंबंधी समस्या असू शकतात. अशाप्रकारेच अस्थमानेही अनेक लोक पीडित असतात.
या दोन्ही समस्यांमध्ये श्वास घेण्यास त्रास, घाबरलेपणा, खोकला, छातीत आखडलेपणा, थकवा, श्वास भरून येणे, घशात खवखव किंवा जळजळ अशी लक्षणं दिसतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेद डॉक्टर इरफान यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.
फुप्फुसातून कफ होईल दूर
डॉक्टरांनी सांगितलं की, ज्या लोकांच्या फुप्फुसांमध्ये अनेक वर्षांपासून जुना कफ जमा असतो, त्यांना या उपायानं अधिक फायदा मिळू शकतो. हा उपाय सतत १० दिवस केला तर कफ लगेच बाहेर येईल आणि फुप्फुसं मोकळे होतील. तसेच श्वास न घेता येण्याची समस्याही दूर होईल.
दम्यापासून मिळेल आराम
दमा म्हणजेच अस्थमाने पीडित लोकांना श्वास घेण्यास समस्या होते, जर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर हा उपाय तुम्हाला लगेच आराम देऊ शकतो. दम्यामुळे छातीत होणारा घर..घर..आवाजही येतो. या सगळ्या समस्या १५ दिवसात दूर होतील.
काय आहे उपाय?
हा उपाय करण्यासाठी दोन तेजपत्ता म्हणजे २ तमालपत्र आणि ४ लवंग घ्या. तमालपत्र आणि लवंग दोन ग्लास पाण्यात टाकून उकडा. पाणी एक ग्लास शिल्लक राहील तोपर्यंत उकडा. नंतर पाणी गाळून एका दुसऱ्या भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या.
डॉक्टरांनी सांगितलं की, श्वास आणि कफाची समस्या दूर करण्यासाठी रूग्णांनी हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं. नाश्ता करण्याच्या अर्धा तास आधी किंवा एक तासानंतर हे पाणी पिऊ शकतं.