शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

रोजच्या खाण्यातील पदार्थांमुळे दातांचं होतंय मोठं नुकसान; पांढऱ्या, मजबूत दातांसाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:33 PM

दात पडला की, त्या जागी आर्टिफिशिअल दात लावण्याची ही ॲडव्हान्स पद्धत इतकी ॲडव्हान्स आहे की, हे दात लावले हे कळतही नाही. पण डेटंल इम्प्लांटस केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

हसतोस काय दात दिसतायत? असं नेहमी म्हणतात. म्हणूनच दातांची काळजी घेणे सौंदर्यासाठी फार महत्वाचे आहे. हल्ली दातांच्या इतक्या नव्या आणि चांगल्या ट्रिटमेंट आल्या आहेत की, तुमचे मूळ दात कसेही असो, तुम्हाला हवे तसे दात हल्ली करुन मिळतात. तुम्ही जन्मताना तुमचे दात कसे होते हे तुम्हाला नवे दात केल्यानंतर अजिबात आठवणार नाही. दातांसाठी केली जाणारी डेंटल इम्प्लांट्स ही ट्रिटमेंट केली जाते. 

दात पडला की, त्या जागी आर्टिफिशिअल दात लावण्याची ही ॲडव्हान्स पद्धत इतकी ॲडव्हान्स आहे की, हे दात लावले हे कळतही नाही. पण डेटंल इम्प्लांटस केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. इम्प्लांटस केल्यानंतर तुम्ही नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याविषयी मुंबई सेंट्रल येथील व्हॉकहार्ट रुग्णालायाचे दंत चिकित्सा आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चिराग देसाई देत आहेत अत्यंत महत्वाची माहिती

डेंटल इम्प्लांटस म्हणजे काय

तरुणपणात दात पडल्यानंतर त्या जागी दुसरा दात येण्याची शक्यता ही फारच कमी असते. एखादा मोक्याचा दात पडला की, हसल्यानंतर तोंड फारच विचित्र दिसतं. असा पडलेला दात पुन्हा येणार नाही हे माहीत आहे. कवळी हा त्यावरचा फार पूर्वी असलेला असा उपाय आहे. जो केवळ ठेवता येतो.त्यानंतर फिक्स कवळी असादेखील प्रकार आला. पण आता त्याहून अधिक अॅडव्हान्स होत डेंटल इम्प्लांटस आले आहेत.यामध्ये तुमचा जो दात पडला आहे त्या ठिकाणी स्क्रू फिट करुन दात लावला जातो. जो तुमच्या इतर दातांसारखाच दिसतो.

अशी घ्या दातांची काळजी

डेंटल इम्प्लांटस केल्यानंतर दातांची काळजी घेणे फार गरजेचे असते. ही प्रोसिजर झाल्यानंतर काही काळ आणि त्यानंतर आयुष्यभरासाठी दातांची काळजी घेण्यासाठी आहारातून काही गोष्टी वगळाव्या लागतात. त्या कोणत्या ते जाणून घेऊया. डेटंल इम्प्लांट सर्जरी झाल्याच्या काही तासांमध्ये गरम खाद्यपदार्थ खाता येत नाहीत. पाणी ही पिणे काही काळासाठी व्यर्ज असते. कारण पाणी पिताना बरेचदा आपण घटाघटा पितो. त्यावेळी ते आत ओढतो. दात नुकताच लावला असेल तर त्याची ग्रीप सैल होण्याची शक्यता असते.

इम्प्लांट करुन झाले असतील आणि आता तुम्ही तुमची रोजची जीवनशैली जगतानाही काही काळजी घेणे गरजेचे असते. दारुचे सेवन हे त्यानंतर करता येत नाही. त्यामध्ये असलेले घटक दात सैल करु शकतात.

काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे हे खाण्यासाठी जरी चटपटीत वाटत असले तरी देखील हे पदार्थ तुमच्या दातांमध्ये अडकू शकता. त्यामुळेही दातांना दुखापत होऊ शकते.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले.... चहा-कॉफीची तुम्हाला सवय असेल तर ही सवय तुम्हाला आताच सोडावी लागेल. कारण चहा-कॉफी तुमच्या नैसर्गिक दातांसोबत तुमच्या नव्या दातांवर डाग देऊ शकते. बटाट्याचे चिप्स, कॉर्न चिप्स असे स्टार्चयुक्त पदार्थ खाणे टाळा. कारण असे पदार्थ दातांमध्ये जाऊन चिकटता. ते काढताना बसवलेला दात निघण्याची किंवा सैल होण्याची शक्यता असते.

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा कडक कँडी, चॉकलेट असे पदार्थही तुम्ही टाळायला हवे. कारण असे पदार्थ तुमच्या दातांना दुखावू शकतात. पिझ्झा,बर्गर अशा ओढून आणि तोंड ताणून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपासूनही दूर राहा कारण असे पदार्थ तुमच्या दातांमध्ये चिकटतात.  हे ही असू द्या लक्षात एकदा इम्प्लांट केले म्हणजे झाले असे होत नाही. काही पदार्थ टाळण्यासोबतच तुम्ही दररोज दातांची योग्य पद्धतीनं साफसफाई करायला हवी. दर 6 महिन्यांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा. जर दात हलत असेल किंवा तुम्हाला इतर दिवसापेक्षा वेगळे वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे कधीही चांगले. आता दातांसंदर्भातील या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दातांची काळजी घ्या आणि सुंदर दिसा.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला