शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

अस्थमावर लो-सोडियम डाएट ठरतं उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 13:12 IST

अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते.

अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते. अस्थमाचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे, अटॉपिक आणि दुसरा प्रकार गैर-अटॉपिक असे दोन प्रकार आढळून येतात. अटॉपिक अस्थमा हा वातावरणातील धूळ. माती, प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होतो. तर गैर-अटॉपिक अस्थमा श्वसनावाटे रासायनिक तत्वांचा शरीरामध्ये समावेश झाल्याने होतो. अस्थमावर जर योग्यवेळी उपचार केले नाही तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अस्थमाच्या आजारावर लो-सोडियम डाएट अत्यंत परिणामकारक ठरतं. 

असे करा उपचार 

अस्थमाच्या आजारामध्ये लो-सोडियम डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. अस्थमाच्या त्रासाचा सामना करावा लागत असेल तर त्यावर उपाय म्हणून सैंधव मीठ खाल्याने आराम मिळतो. त्याचबरोबर मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सूज, वेदना, कोरडा खोकला यांपासून सुटका होत. याव्यतिरिक्त फ्रेश आणि फ्रोजन भाज्या कोणत्याही सॉसशिवाय खाल्याने फायदा होतो. तसेच ड्रायफ्रुट्सही अस्थमावर परिणामकारक ठरतात. 

अस्थमामुळे दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो. तसेच सातत्याने वैद्यकिय तपासणीची आवश्यकता असते. साधा ते तीव्र अस्थमा असलेल्या व्यक्तींनी दिर्घकाळ आणि दैनंदिन औषधं घेतल्याने दम्याच्या त्रासातून सुटका होऊ शकते. 

लक्षणं :

- कफ किंवा कोरडा खोकला येणं- छातीमध्ये दुखणं आणि अस्वस्थ वाटणं. - व्यायाम करताना सतत दम लागणं आणि अस्वस्थ वाटणं- जोरात श्वास घेतल्याने थकवा येणं- श्वास घेण्यास त्रास होणं- थंड हवेमध्ये श्वास घेण्यास त्रास होणं

कारणं :

- कारखने, वाहनांमधून येणारा धूर - सर्दी, ताप, धुम्रपान, वातावरात होणारे बदल- अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ - पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणं. - औषधं आणि मद्यपान यांच्या अतिसेवनाने- आनुवांशिक कारणामुळे

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार