शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा खरंच फायदा होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 14:14 IST

जे लोक सूर्यप्रकाशात जात नाहीत, सतत घरात राहतात किंवा बाहेर गेले तरी त्वचा पूर्ण झाकतात अशा लोकांना ड जिवनसत्त्वाची कमतरता भासू शकते.  हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहाणे, धूम्रपान बंद करणे, शरीरयष्टी अतीबारिक न ठेवणे आणि ओस्टीओपोरोसिस कमी करण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे

न्यू यॉर्क- ड जिवनसत्वाच्या सप्लिमेंटसचा उपयोग वृद्ध व्यक्तींच्या हाडांची स्थिती सुधारावी तसेच हाडे कमकुवत करणाऱ्या ओस्टीओपोरोसिससारख्या आजारांमध्ये केला जातो. मात्र एका नव्या संशोधनानुसार सूर्यप्रकाशातून मिळणारे ड जीवनसत्त्व या सप्लिमेंटसमध्ये नसते असे स्पष्ट झाले आहे. हाडांची घनता वाढावी, हाडे तुटण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी या गोळ्यांचा उपयोग होईलच असे नाही असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ड जीवनसत्त्व मुख्यत्त्वे सूर्यप्रकाशातून  मिळते. ड जिवनसत्त्वाची सप्लिमेंटस घेणं अगदी सामान्य गोष्ट आहे. उत्तर अमेरिकेमध्ये ४० टक्के वृद्ध त्यांचा वापर करतात. लहान मुलांमध्ये रिकेटस किंवा प्रौढांमध्ये ओस्टीओमलेसिया (हाडे मृदू होणं) अशा आजारांमध्ये त्यांचा उपयोग होतो.  जे लोक सूर्यप्रकाशात जात नाहीत, सतत घरात राहतात किंवा बाहेर गेले तरी त्वचा पूर्ण झाकतात अशा लोकांना ड जिवनसत्त्वाची कमतरता भासू शकते.  हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहाणे, धूम्रपान बंद करणे, शरीरयष्टी अतीबारिक न ठेवणे आणि ओस्टीओपोरोसिस कमी करण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे असे मत या संशोधनाचं काम पाहाणाऱ्या डॉ. अ‍ॅलिसन अ‍ॅवेनेल यांनी व्यक्त केले.

अ‍ॅवेनेल यांच्या नव्या संशोधनानुसार ड जिवनसत्त्वाच्या सप्लिमेंटसबद्दलच्या मार्गदर्शक सूचना बदलल्या पाहिजेत. अ‍ॅवेनेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ड जिवनसत्त्वासंदर्भाती ८१ संशोधनांचा अभ्यास केला. कॅल्शियम सप्लिमेंटसचा हाडांची खनिजघनता वाढणे, फ्रॅक्चरशी संबंध आहे मात्र त्यामुळे हृद्याच्या रक्तवाहिन्यांसंदर्भात त्रास निर्माण होऊ शकतात. ड जिवनसत्त्वाची औषधे फ्रॅक्चर कमी करणे, खुब्याचे फ्रॅक्चर यावर कोणताही अर्थपूर्ण असा फायदा होत नसल्याचे त्यांना समजले. अर्थात अ‍ॅवेनेल यांच्या या नव्या माहितीवर सर्वांचे एकमत झालेले नाही. जेव्हा ड जिवनसत्त्वाची पातळी कमी होते तेव्हा या औषधांची मदत होते याचे पुरावे असल्याचे मत डफी मॅके यांनी व्यक्त केले आहे.  तसेच ड जिवनसत्त्वाच्या गोळ्यांचा हाडांचे आरोग्य सुधारण्यात कोणतीही भूमिका नाही हे या संशोधनाने पटवून दिले पाहिजे असे मत न्यू यॉर्कच्या लिनक्स हिल रुग्णालयातील डॉक्टर मिनिषा सूद यांनी मांडले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स