स्वाईनसाठी वार्षिक लसीकरणाटी मोहीम राबवावी - डब्ल्यूएचओ
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:25+5:302015-03-06T23:07:25+5:30
स्वाइनसाठी वार्षिक लसीकरणाठी मोहीम राबवावी - डब्लूएचओ

स्वाईनसाठी वार्षिक लसीकरणाटी मोहीम राबवावी - डब्ल्यूएचओ
स वाइनसाठी वार्षिक लसीकरणाठी मोहीम राबवावी - डब्लूएचओकोलकाता : स्वाइन फ्लूसारख्या आजारांना तोंड देण्यासाठी वार्षिक लसीकरण मोहीम हाच उपाय आहे, असे जागतिक आरोग्य संस्थेतर्फे (डब्लूएचओ) सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने तब्बल १,२०० हून अधिक मृत्यू झाले. या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवदेनात पुढे म्हटले आहे, की सर्दीची साथ आली असेल तरीही स्वाइनवरील लस घ्यावी, जेणेकरून या रोगाच्या संक्रमणावर काही प्रमाणात तरी नियंत्रण ठेवता येईल आणि यामुळे होणार्या गंभीर आजारापासून बचाव करता येईल. जागतिक आरोग्य संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, की ही लस तीन-चार प्रकारच्या इन्फ्ल्युएंझापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात पुढे म्हटले आहे, की २०१४-२०१५ या वर्षात स्वाइन फ्लूचा प्रसार जगभरात वाढताना दिसत आहे. भारतात एच.एन. स्वाइनचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांची संख्या सुमारे २३ हजार आहे. एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक प्रमाण गुजरातमध्ये असून, तेथील बळींचा आकडा ३०० आहे.