शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कोरोना 'या' देशाच्या लॅबमध्ये तयार केला गेला, चीनमध्ये नाही!... अर्थतज्ज्ञाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:24 IST

कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे.

कोरोना महासाथीला दोन वर्षे उलटली तरी त्याच्या उगमाबाबत अद्याप समजलं नाही आहे (Coronavirus origin). सुरुवातीला वटवाघळामार्फत हा व्हायरस पसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, त्यानंतर चीनच्या वुहान लॅबमधून तो पसरल्याचा आरोप करण्यात आला (Coronavirus Leak from china wuhan lab). अद्यापही कोरोनासाठी चीनलाच जबाबदार धरलं जात आहे. अशात आता कोरोनाच्या स्रोताबाबत नवा दावा केला जातो आहे. ज्यात कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरल्याचं सांगितलं जातं आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. कारण हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर अमेरिकाच आहे (Coronavirus Leak from Us lab).

कोरोनासाठी अमेरिका वारंवार चीनवर आरोप करत आहे. त्याच अमेरिकेतील तज्ज्ञांनी कोरोनाच्या स्रोताबाबत नवा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ज्ञ जेफरी सैस यांच्या मते, हा व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधून नव्हे तर अमेरिकेच्या लॅबमधूनच पसरला आहे. सैस यांनी याआधीही कोरोना महासाथ चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांमध्ये झालेल्या प्रयोगाचा परिणाम असल्याचं सांगितलं होतं.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेफरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की दोन वर्षे लॅन्सेटससाठी एका आयोगाच्या अध्यक्षतपदी मी काम केलं आणि हा खतरनाक व्हायरस यूएस लॅब बायोटेक्नॉलॉजीतून लीक झाल्याचा मला पूर्ण विश्वास आहे.  कोरोना हा नैसर्गिक आहे असं म्हणणं चुकीचं आहे.  कोरोना अमेरिकेच्या लॅबमधून पसरल्याचे पुरेसे पुरावेही आपल्याकडे आहेत, असं सांगत त्यांनी याचा तपास करावा अशी मागणीही केली आहे.

जेफरी यांच्या दाव्याचं समर्थन चीननेही केलं आहे. चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जेफरी यांच्या दाव्याचा सखोल तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडनॉम घेब्रियेस यांनीही कोरोनाच्या लॅब लीक थिएरीचा तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनी कोरोना चीनच्या लॅबमधून लीक झाल्याचा उल्लेख केला होता.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिका