Jeera jaggery water : फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे जाणून घेऊ.
कसं बनवाल गूळ आणि जिऱ्याचं पाणी?
गूळ आणि जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी टाका. आता यात एक चमचा जिरे आणि गुळाचा एक छोटा तुकडा टाका. या पाण्याला चांगली उकडी येऊ द्या. पाणी चांगलं उकडल्यानंतर आणि रंग बदलल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घ्या. हे पाणी पिऊन आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करता येतात.
आरोग्यासाठी वरदान
गूळ आणि जिऱ्याच्या पाण्यानं बॉडी डिटॉक्स करण्यास मदत मिळते. हे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि अनेक समस्यांचा धोकाही कमी होतो. त्याशिवाय जर हे पाणी नियमितपणे प्याल तर शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. या नॅचरल ड्रिंकनं जॉइंट्समधील दुखणंही कमी होतं.
दूर होतील अनेक समस्या
जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल तर गूळ आणि जिऱ्याचं पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. कारण हे पाणी पिऊन इम्यूनिटी वाढते आणि इम्यूनिटी वाढली तर वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही या ड्रिंकनं दूर होतात. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होऊन पचन तंत्र मजबूत होतं. तसेच हे ड्रिंक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासही फायदेशीर ठरतं.