शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मूग भिजवून खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 10:13 IST

Soaked Moong Benefits : अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Soaked Moong Benefits : आजकाल लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी पौष्टिक आहारावर अधिक भर देतात. हिवाळ्यात तर अनेक पौष्टिक पदार्थांचं सेवन केलं जातं. वेगवेगळे कडधान्य भिजवून खातात. यातीलच एक म्हणजे मूग. मूग डाळीचं तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतातच. मात्र, अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

मुगाची खासियत

मुगात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत मिळते, तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. महत्वाची बाब म्हणजे मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे शरीरात शुगर लेव्हल हळूहळू वाढते.

मूग भिजवून खाण्याचे फायदे

१) पचनक्रिया सुधारते

मूग भिजवून ठेवल्याने ते मुलायम होतात आणि यातील विषारी तत्व निघून जातात. मुगाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया आणखी मजबूत होते आणि पोटासंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्ठताही दूर होते. तसेच मूग भिजवून खाल्ले तर पचनही लवकर होतात आणि त्यातील पोषक तत्वांचं अवशोषणही चांगलं होतं.

२) वजन कमी होतं

हिरवे मूग भिजवून खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात कॅलरी खूप कमी असतात. यात फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडण्यास मदत मिळते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मूगाचा तुमच्या आहारात समावेश करा.

३) हृदयासाठी फायदेशीर

मुगात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फॉलिक अ‍ॅसिडसारखे महत्वाचे तत्व असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. याने ब्लड प्रेशर कंट्रोल होतं, हृदयाची धडधड नियमित होते आणि रक्तात वाढलेली कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. मूगाच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी राहतो.

४) किडनीसाठी फायदेशीर

मुगाचं किंवा मूग डाळीचं नियमित सेवन केल्यास किडनीची कार्यक्षमता चांगली होते. याने शरीरात वाढलेलं यूरिक अ‍ॅसिड आणि विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच किडनीचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

५) इम्यून सिस्टीम मजूबत होतं

मुगात आयर्न, झिंक आणि सेलेनियमसारखे खनिज असतात, जे शरीराची इम्यूनिटी वाढवतात. याने शरीराची रोगांसोबत लढण्याची क्षमता वाढते. तसेच यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.

कसं करावं सेवन?

मूग भिजवण्याआधी चांगले धुवून घ्या. नंतर ते पाण्यात ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. सकाळी याचं सेवन सलाद म्हणून करू शकता. याची टेस्ट वाढवण्यासाठी यात लिंबाचा रस, काळे मिरे टाकू शकता.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य