शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

केळीची साल आरोग्यासाठी असते रामबाण, फायदे वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:36 IST

Benefits of Banana Peels: केळीची सालही आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळीच्या सालीचे अनेक अवाक् करणारे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ यातील पोषक तत्व आणि त्यांच्या फायद्याबाबत...

5 Benefits of Banana Peels: सगळ्याच वयोगटातील लोकांना केळी खाणं आवडतं. हे फळ फार मुलायम, गोड आणि टेस्टी असतं. तसेच यात भरपूर पोषक तत्व असतात आणि हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानलं जातं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केळीची सालही आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळीच्या सालीचे अनेक अवाक् करणारे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ यातील पोषक तत्व आणि त्यांच्या फायद्याबाबत...

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, केळी आणि त्याची साल दोन्हीचे वेगवेगळे फायदे मिळतात. कच्ची केळं पचनासंबंधी दूर करण्यासाठी फार प्रभावी ठरू शकतात. तर पिकलेल्या केळी शरीराला संक्रमणासोबत लढण्यात मदत करतात. केळीच्या सालीपासून हेल्दी स्नॅक्स आणि मिठाई बनवली जाऊ शकते. 

केळीच्या आतील भाग नरम आणि गोड असतो. तर केळीची साल थोडी जाड आणि कडवट असते. केळी जेवढी पिकलेली असेल त्याची सालही तेवढी गोड आणि मुलायम असते. केळीवर अनेक केमिकल्सचे फवारे मारले जातात. त्यामुळे केळीची साल खाण्याआधी ती चांगली धुवून घ्यावी. नाही तर त्याने नुकसान होऊ शकतं.

केळीच्या सालीचे 5 मोठे फायदे

- केळीच्या सालीमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, शुगर, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम आणि आयरनसोबत भरपूर पोषक तत्व असतात. याचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि यांची कमतरता होत नाही. पोषक तत्व शरीर मजबूत करण्यासाठी गरजेचं असतात.

- केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असतं, ज्याने मूड डिसऑर्डर आणि डिप्रेशनपासून आराम मिळतो. ट्रिप्टोफॅन शरीरात जाऊन सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होतं, ज्याने तुमचा मूड चांगला होता. सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी6 ने झोपेत सुधारणा होते, मूड चांगला होता.

- केळीच्या सालीमध्ये फायबर भरपूर असतं, ज्याने डायजेशनसंबंधी समस्या दूर होते. बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या रूग्णांनी केळीची साल खाल्ली पाहिजे. क्रोहन डिजीज आणि इरिटेबल बाउल सिंड्रोमच्या रूग्णांसाठीही केळीची साल फार फायदेशीर मानली जाते.

- डोळे हेल्दी ठेवण्यासाठी केळ्या सालीचं सेवन केलं पाहिजे. केळीच्या सालीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए ने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि डोळे मजबूत होतात. हे व्हिटॅमिन केळी आणि केळीच्या सालीमध्ये भरपूर असतं.

- केळीच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स, कॅरोटीनॉयड आणि इतर एंटीऑक्सिडेंट भरपूर असतात. कच्च्या केळीची साल खाल्ल्याने तुमच्या एंटीऑक्सीडेंट लेव्हल वाढते आणि कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य