शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे एकापेक्षा एक फायदे, शरीरातील अनेक समस्या लगेच होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:10 IST

Banana Leaves Juice Benefits : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये केळीच्या पानांचा रस मिक्स केला जातो. कारण केळीच्या पानांमधील पोषक तत्वांनी यूव्ही किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येतं.

Banana Leaves Juice Benefits : साऊथ इंडियामध्ये केळीच्या पानांवर जेवण करण्याची फार जुनी पद्धत आहे. असं सांगितलं जातं की, केळीच्या पानावर जेवण केल्याने व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं. केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण अनेकांना केळीच्या पानांचा ज्यूस पिण्याचे फायदे माहीत नसतील.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजकाल अनेक प्रकारच्या लोशनमध्ये केळीच्या पानांचा रस मिक्स केला जातो. कारण केळीच्या पानांमधील पोषक तत्वांनी यूव्ही किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येतं. तसेच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

पोटाची समस्या होईल दूर

जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असेल तर केळीच्या पानांचा ज्यूस सेवन करू शकता. या पानांमध्ये पचनक्रिया चांगली करण्यास मदत करणारे गुण असतात. केळीच्या पानांमुळे अपचन आणि डायरियासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

बॉडी डिटॉक्स

केळीच्या पानांच्या रसामध्ये डिटॉक्सीफाईंग गुण असतात. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते.

ताप कमी होईल

केळीच्या पानांचा ज्यूस ताप कमी करण्यास खूप फायदेशीर मानला जातो. या पानांमधील फायटो केमिकल्समध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरियल, अ‍ॅंटी-मायक्रोबियल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, यांनी शरीरातील ताप कमी होतो.

कॅन्सरवर उपाय

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, केळीच्या पानांच्या ज्यूसने कॅन्सरसारखा जीवघेण्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो. याच्या अर्कामध्ये पॉलीफेनॉल आणि फ्लेवोनोइड्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही तत्वांमध्ये कॅन्सरसोबत लढण्याचे गुण असतात. 

केळीच्या खोडाचा ज्यूसही फायदेशीर

आयुर्वेद डॉ. डिंपल यांनी केळीच्या खोडाच्या ज्यूस पिण्याचे फायदे, पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे. केळीच्या खोडाचा ज्यूस प्यायल्याने फॅटी लिव्हरसारखी समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर आतून स्वच्छ करण्यासही मदत होते. केळीच्या खोडाच्या ज्यूसमधून शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम मिळतं.केळीच्या खोडाच्या ज्यूसचे फायदे

फॅटी लिव्हर समस्या होईल दूर

फास्ट फूड, जंक फूड आणि अधिक मद्यसेवनामुळे लिव्हरवर फॅट जमा होतं. पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो. अशात केळीच्या खोडामधील अॅंटी-ऑक्सिडेंट कोलेस्ट्रॉल दूर करतं ज्यामुळे लिव्हरवरील फॅटही दूर होतं.

बॉडी डिटॉक्स

आतड्यांची स्वच्छता होत नसल्याने अनेक पोटासंबंधी समस्या होत राहतात. या ज्यूसमुळे लोअर डायजेस्टिव सिस्टीममधील सगळे ब्लॉकेज दूर होतात. यामुळे तुमचं पचन वाढतं आणि पोटातील चरबीही लगेच कमी होते.

कुणी प्यावा हा हेल्दी ज्यूस?

डॉक्टरांनुसार ज्या लोकांना एनीमिया, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांनी आवर्जून या ज्यूसचं सेवन करावं. पण किडनीची समस्या असेल तर जरा काळजी घ्यावी.

पिण्याची वेळ आणि पद्धत

डॉ. डिंपल यांच्यानुसार यापासून फायदा मिळवण्यासाठी ७ ते १० दिवस हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी ३० ते १० मिली प्यावा. केळीच्या खोडाच्या ज्यूसने हळूहळू तुमची समस्या दूर होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य