'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 06:49 PM2021-01-06T18:49:55+5:302021-01-06T19:05:42+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायंसेसचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. रणदिप गुलेरिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Aiims director dr randeep guleria says do not give covid-19 vaccine in children and preganent woman | 'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

Next

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी उपाय केले जात आहेत. कोरोनाच्या कहरात भारतानं दोन लसींच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी मिळाली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायंसेसचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. रणदिप गुलेरिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

भारतातील दोन्ही लसींच्या चाचण्या सुरू आहेत.  एम्सचे डायरेक्टर डॉक्टर रणदिप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर लहान मुलं आणि वयस्कर लोकांना लस दिली जाणार नाही. यामागे सुरक्षा हे सगळ्यात मोठं कारण आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पाहिल्यास प्रेंग्नंट महिलांना आणि लहान मुलांना लस देणं योग्य ठरणार नाही. लसीकरणासाठी  सुरक्षितेच्या बाबतीतही विचार करणं गरजेचं आहे. 

लसीचा चांगला परिणाम वयस्कर लोकांमध्ये दिसून आल्यास  लहान मुलं आणि प्रेग्नंट महिलांना यात सहभागी करून घेतलं जाणार आहे. डॉ. गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार १० ते १४ दिवसांच्या आत आरोग्य कर्मचारी वर्गाला लस दिली जाऊ शकते. 

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डची वैशिष्ट्ये

कोव्हॅक्सिन - कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि पुण्यामधील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसोबत मिळून विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे. आजार पसरवणाऱ्या विषाणूला निष्क्रिय करून ही व्हॅक्सिन विकसित करण्यात आली आहे. चाचण्यांमध्ये झालेल्या चाचण्यांशिवाय कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये 800 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही 26 हजार जणांवर करण्यात आली होती.

कोव्हॅक्सिनचा एफिकेसी डेटा आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा एफिकेसी डेटा हा मार्चच्या अखेरीपर्यंत प्रसिद्ध होईल, त्यानंतर त्याची रेग्युलेटरी मंजुरी घेतली जाईल. तसेच कंपनी याची चौथ्या टप्प्यातील चाचणीही सुरू ठेवणार आहे. ज्यामध्ये काही वर्षांपर्यंत स्वयंसेवकांवर देखरेख ठेवली जाईल.

कोविशिल्ड - कोविशिल्ड लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने ब्रिटिश-स्वीडिश कंपनीने एस्ट्राजेनेकासोबत मिळून विकसित केली आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्युट याचे उत्पादन करत आहे. कोविशिल्ड ही लस चिम्पान्झी एडेनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित लस आहे. यामध्ये चिम्पान्झीला संक्रमित करणाऱ्या विषाणूला अनुवांशिकरीत्या संशोधित करण्यात आले आहे. Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

ज्यामुळे हा विषाणू शरीरात पसरत नाही. या संशोधित विषाणूमधील एक भाग कोरोना विषाणूचा आहे. ज्याला स्पाइक प्रोटिन म्हटले जाते. ही लस शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स तयार करतो. तो स्पाइक प्रोटिनवर काम करतो. ही लस अँटिबॉडी आणि मेमरी सेल्स विकसित करते. ज्यामुळे कोविड-19 ला ओळखण्यात मदत मिळते. सीरम इन्स्टिट्युटने 23 हजार 745 पेक्षा अधिक स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी केली आहे. याच्या निष्कर्षांमध्ये 70.42 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 1600 जणांवर आतापर्यंत चालू आहे. सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत

Web Title: Aiims director dr randeep guleria says do not give covid-19 vaccine in children and preganent woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.