Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

By Manali.bagul | Published: January 6, 2021 01:47 PM2021-01-06T13:47:13+5:302021-01-06T14:24:34+5:30

Health Tips in Marathi : जर चिकन चांगल्या पद्धतीने शिजलं गेलं नाही तर धोका वाढू शकतो. तुम्ही घरात चिकन शिजवत असाल तर योग्य ती काळजी घ्याल, पण बाहेरचं आणून खात असाल तर मात्र सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  

Bird flu alert in states chicken eggs safe know about precautions expert | Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

Dont worry! चिकन खाल्यास बर्ड फ्लूचा धोका नाही; फक्त 'ही' काळजी घ्यावी लागणार, तज्ज्ञांचा सल्ला

googlenewsNext

देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने कहर केला आहे. दिवसेंदिवस मुकी जनावरं माणसांसाठी धोकादायक ठरत आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि केरळ या राज्यात बर्ड फ्लूने  हाहाकार पसरवला आहे.  आता बर्ड फ्लूमुळे माणसांना कितपत धोका उद्भवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चिकन खाल्यानं बर्ड फ्लू पसरेल का? चिकन खायचं की नाही असे प्रश्न लोकांना पडत आहे.  आजतकशी बोलताना Central Poultry Development Organization च्या डॉक्टर कामना यांनी या बाबत अधिक माहिती दिली आहे. बर्ड फ्लूच्या प्रसारामुळे अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुम्हीही कोणत्याही पोल्ट्री फॉर्मच्या आजूबाजूला जाणार नाही अशी काळजी घ्यायला हवी. 

डॉ. कामना यांनी दिलेल्या माहितीनुसार अंडी, चिकन खाताना  सावधगिरी बाळगायला हवी. जर चिकन चांगल्या पद्धतीने शिजलं गेलं नाही तर धोका वाढू शकतो. तुम्ही घरात चिकन शिजवत असाल तर योग्य ती काळजी घ्याल पण बाहेरचं आणून खात असाल तर मात्र सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  कारण बाहेरचं चिकन जास्त शिजलं नसेल तर आरोग्याला धोका उद्भवू शकतो. 

बर्ड फ्लू वेगवेगळ्या राज्यात वेगाने पसरत आहे. पक्ष्यांमधून माणसांमध्ये पसरण्याचा धोका वाढत आहे. जे लोक पोल्ट्री फॉर्मध्ये काम  करतात त्यांना धोका जास्त असू शकतो. पोल्ट्री फॉर्ममध्ये  कामाला असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. अनेकदा सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बर्ड फ्लूच्या प्रसाराचं कारण ठरू शकतं.

एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी अधिकाधिक साफसफाईवर लक्ष द्यायला हवं. कारण कोरोना काळात लोकांना आधीच स्वच्छता आणि हात धुण्याची सवय झाली आहे. त्यामुळे जास्त काही वेगळी काळजी घ्यायची गरज नाही.  स्वच्छता, खाण्यापिण्यावर नियंत्रण, काय खायचं, काय नाही खायचं हे पाहून तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता. 

फक्त धुम्रपान नाही तर 'या' कारणांमुळे उद्भवतोय फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या लक्षणं

मध्य प्रदेशातील सरकारने आपल्या परिसरातील लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.  दरम्यान चिकन किंवा अंडे खाल्ल्यानं कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार चिकन, अंडी  चांगल्या पद्धतीनं शिजलेली असतील तर आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.  म्हणून शिजवताना अन्न, मास कच्च राहू देऊ नका. 

सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत

मध्य प्रदेशातील अनेक कोंबड्यामध्ये व्हायरसने नमुने दिसून आलेले नाहीत. त्यामुळे चिंतेचे कारण कमी आहे. कारण व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका कोंबड्यांमध्ये असतो. मध्यप्रदेशात आता कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानं चिंतेचं वातावरण पसरले आहे.  

H5N1 पासून H5N5 बर्ड फ्लू धोकादायक मानले जातात. ते वेगानं पसरतात. मात्र H5N8 एवियन इन्फ्लुएंजानं केवळ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. H5N1 विषाणू अतिशय धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. H5N1 च्या विषाणूनं माणसाच्या शरीरात प्रवेश केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र तो माणसातून माणसात पसरलेला नाही. मात्र हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. या विषाणूची लागण झालेले ६० टक्के जण जीवाला मुकतात.  H5NI विषाणूची लागण माणसांना झाल्यास धोकादायक ठरू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. विषाणूची बाधा झाल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. याशिवाय जीव जाण्याचा धोका असतो.

 

 

Web Title: Bird flu alert in states chicken eggs safe know about precautions expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.