दुनियादारीमधील 'सुरेखा' ही बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 01:25 IST
मृणाल पाठोपाठ आता, रिचा परियाली ही बोहल्यावर
दुनियादारीमधील 'सुरेखा' ही बोहल्यावर
मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या वेडिंग का सिझन है म्हणण्यास हरकत नाही. कारण मृणाल पाठोपाठ आता, रिचा परियाली ही बोहल्यावर चढली आहे. अहो रिचा, म्हणजेच आपली दुनियादारी मधील सुरेखा ओ. हो ही सुद्धा रौनक शहा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दुनियादारी या चित्रपटातील रीचाची सुरेखा ही भूमिका फारच गाजली होती. याविषयी अभिनेत्री प्रिया मराठे हिने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधला असता, प्रिया म्हणाली खूप मजा आली. रिचाच्या लग्नाला जायला जमले नाही. पण रिसेप्शनला कांदिवली येथे पोहचले. तसेच इंडस्ट्रीमधील मोजक्याच लोकांना तिने इनव्हाइट केले होते. मी खूप लकी की मृणाल पाठोपाठ रिचाच्या ही लग्नात सहभागी होता आले. चला तर, रिचाला ही लग्नाच्या शुभेच्छा देउयात. शेवटी, ही सुरेखा....रौनकला पटलेली हाय....