वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट कुळीथ डाळ, फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:50 PM2019-05-22T12:50:13+5:302019-05-22T12:52:31+5:30

वजन कमी करण्यासाठी डाळी महत्त्वाची भूमिका निभावतात. यात महत्त्वाची डाळ म्हणजे कुळीथ.

Add Kulith in your diet for weight loss | वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट कुळीथ डाळ, फायदे वाचून व्हाल थक्क!

वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट कुळीथ डाळ, फायदे वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सतत समोर येत असतात. यात वर्कआउट आणि योग्य आहारासाठी अधिक आग्रह असतो. प्रत्येकालाच वेगवेगळ्या कारणांनी वर्कआउटसाठी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा पूर्णपणे आहारावर अवलंबून रहावं लागतं. पण वर्कआउट करणेही तितकंच गरजेचं आहे, जेवढा चांगला आहार. 

(Image Credit : Skinny Ms.)

वजन कमी करण्यासाठी डाळी महत्त्वाची भूमिका निभावतात. यात महत्त्वाची डाळ म्हणजे कुळीथ. या डाळीबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. या डाळीमध्ये प्रोटीन आणि पोषक तत्त्वांचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच आरोग्यालाही अनेक फायदे होतात. 

कुळीथ या डाळीचा वापर उत्तराखंडमध्ये अधिक केला जातो. जर तुम्हालाही वजन कमी करण्याची किंवा नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी कुळीथ डाळ फार फायदेशीर ठरू शकते. सामान्यपणे शाकाहारी लोक त्यांना जेवढी प्रोटीनची गरज असते ती पूर्ण करू शकत नाहीत. अशात त्यांची प्रोटीनची गरज कुळीथ डाळ पूर्ण करू शकते. 

डाळीची खासियत

एक वाटी कुळीथ डाळीमधून तुम्हाला जवळपास १५ ते १० टक्के प्रोटीन मिळू शकतं. त्यामुळे रोजच्या आहारात या डाळीचा तुम्ही समावेश करू शकता. केवळ प्रोटीनच नाही तर या डाळीमध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. वजन कमी करण्याचा हिशेबाने बघायचं तर ही डाळ खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरून राहतं. त्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहता. 

कुळीथ डाळीचे फायदे

१) कुळीथ डाळ खाल्ल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. आणि पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते. आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, कुळीथ डाळ खाऊन महिलांना हार्मोनल बदलामुळे होणारी प्रीमेंसट्रअल ब्लोटिंगची समस्याही दूर होते. 

२) रोज या डाळीचे सेवन केल्याने शरीराची पचनक्रिया चांगली राहते. तुम्ही जे काही खाल ते व्यवस्थित पचतं. 

३) कुळीथ डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तसेच या डाळीचं पीठ तुम्ही राजमा किंवा करीमध्ये टाकूनही खाऊ शकता. 

४) वजन कमी करण्यास मदत करणारी कुळथीच्या डाळीचे पीठ पाण्यात मिश्रित करून सेवनही करू शकता. याने आरोग्याला अनेक फायदे होतात. दक्षिण भारतात ही या डाळीचं पीठ पाण्यात उकडून या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे दक्षिण भारतातील महिला लवकर जाडेपणाचा शिकार होत नाही, असेही सांगितले जाते. 

५) कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ मुतखड्यावर औषधाप्रमाणे काम करतात. मेद वाढला असता, सूज आली असता, जंत झाले असता हितकर असतात.

Web Title: Add Kulith in your diet for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.