तळव्यावर अ‍ॅक्युप्रेशर पॉंईट्सने योग्य ठिकाणी दाब द्या, मोठ्या समस्यांचे चुटकीसरशी निराकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 03:26 PM2021-11-15T15:26:35+5:302021-11-15T15:26:45+5:30

मोठं आजारपण असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो; पण काही छोट्या-मोठ्या दुखण्यांसाठी अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) या उपचार पद्धतीचा वापर करणं शक्य आहे.

acupressure for feet helpful for health | तळव्यावर अ‍ॅक्युप्रेशर पॉंईट्सने योग्य ठिकाणी दाब द्या, मोठ्या समस्यांचे चुटकीसरशी निराकरण

तळव्यावर अ‍ॅक्युप्रेशर पॉंईट्सने योग्य ठिकाणी दाब द्या, मोठ्या समस्यांचे चुटकीसरशी निराकरण

googlenewsNext

आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्टांना चांगल्या आरोग्याची (Health) जोड आवश्यक असते. आरोग्य चांगलं असेल तर आपण कुठलंही काम हाती घेऊ शकतो आणि ते व्यवस्थित पार पाडू शकतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लहान-मोठ्या शारीरिक समस्यांमध्येही वाढ झाल्याचं चित्र आहे. मोठं आजारपण असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो; पण काही छोट्या-मोठ्या दुखण्यांसाठी अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) या उपचार पद्धतीचा वापर करणं शक्य आहे.

अतिशय प्राचीन चिनी उपचारपद्धती असलेल्या अ‍ॅक्युप्रेशरमध्ये शरीरातल्या विविध बिंदूंवर दाब टाकून उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या शरीरामध्ये एक हजारपेक्षाही जास्त प्रेशर पॉइंट (Pressure point) असतात. त्यापैकी काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्या पायामध्ये असतात. त्यांचा वापर करून अनेक छोट्या-मोठ्या आरोग्य समस्यांमध्ये आराम मिळू शकतो, याबद्दलचे वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'ने प्रसिद्ध केले आहे.

आपल्या पायांतल्या प्रेशर पॉइंट्सचा वापर करून पुढच्या शारीरीक समस्यांतून आराम पडू शकतो. हृदयाशी (Heart) संबंधित असलेल्या आजारांसाठी अ‍ॅक्युप्रेशर ही एक चांगली थेरपी ठरू शकते. तुम्ही हृदयरोगी असाल, तर दोन्ही पायांच्या बोटांमधला प्रेशर पॉइंट दाबावा. त्यामुळे हार्टअटॅकचा (Heart Attack) धोका कमी होतो. एखाद्याच्या हृदयाचे ठोके मंद झाले असतील, तर त्यालादेखील या प्रेशर पॉइंटवर दाबल्यामुळे आराम मिळू शकेल आणि हृदयाच्या ठोक्याची गती सुधारू शकेल. यकृताची (Liver) समस्या असल्यास अंगठा आणि बोटाच्या मधला भाग पायाच्या वरच्या बाजूने दाबा. यामुळे नक्कीच आराम पडेल.

पायातले अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट दाबल्यास पाठदुखी (Backpain) आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवरदेखील आराम पडतो. यासाठी पायांच्या तळव्याच्या एकदम मधल्या भागावर दाब द्या. तळव्याच्या मध्यभागावर असलेला प्रेशर पॉइंट थेट आतड्यांशी संबंधित असतो. याच पॉइंटमुळे पाठीच्या दुखण्याबरोबरच पचनक्रियादेखील सुधारते. आजकाल सर्व्हायकल समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी अॅक्युप्रेशर थेरपी फायदेशीर ठरू शकते. वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी पायाच्या अंगठ्यावर दाब द्यावा. पायाच्या अंगठ्याचा संबंध घशाशी असतो. त्यामुळे हा प्रेशर पॉइंट दाबल्यानं खूप आराम मिळतो.

अ‍ॅक्युप्रेशर उपचार पद्धतीमध्ये शरीरातल्या ऊर्जेला फार महत्त्व असतं. आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची वाहती ऊर्जा असते. तिच्या वहनामध्ये अडथळा आल्यास आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होते. प्रेशर पॉइंटवर दाब दिल्यास ही ऊर्जा पुन्हा वाहती होण्यास मदत होते.

Web Title: acupressure for feet helpful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.