शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रोज करता ते जेवण आयुर्वेदिक कसं बनवाल? डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:52 IST

Ayurvedic Meal : आयुर्वेदात आयुर्वेदिक जेवण कसं असतं, याबाबतही सांगण्यात आलं आहे. हे आयुर्वेदिक जेवण तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतं.

Ayurvedic Meal : आयुर्वेदात केवळ आरोग्यासंबंधी नाही तर जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. उठण्या-बसण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंतचे झोपण्याचे सगळे नियम सांगितले आहेत. जे फॉलो करून तुम्ही एक नॅचरल आणि हेल्दी जीवन जगू शकता. हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच तुमचं आयुष्यही वाढवतात. आयुर्वेदात आयुर्वेदिक जेवण कसं असतं, याबाबतही सांगण्यात आलं आहे. हे आयुर्वेदिक जेवण तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतं. 

तुम्ही आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सेबाबत, आयुर्वेदिक औषधांबाबतही ऐकलं असेल. पण आपण जे जेवतो किंवा खातो त्याला आयुर्वेदिक कसं करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर प्रसिद्ध आयुर्वेडिक डॉक्टर निधी पांड्या यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आयुर्वेदिक जेवण बनवण्याची पद्धत

गरम आणि मऊ जेवण

डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण नेहमीच गरम आणि मऊ केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी अन्न पचनास मदत करणाऱ्या अग्निसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अन्न चांगलं शिजवा, गरम ठेवा आणि मसाल्यांचा योग्य वापर करा. अन्न मुलायम किंवा नरम ठेवण्यासाठी गुड फॅटचा वापर करा.

जेवणात ६ रस

आयुर्वेदानुसार संपूर्ण जेवण तेच असतं, ज्यात ६ रसांचा समावेश असतो. गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट आणि अस्ट्रिंजेंट हे रस जेवणात महत्वाचे असतात.

कशातून मिळतील हे रस

गोड - गोडवा तुम्हाला पोषण देणाऱ्या जेवणातून म्हणजे धान्य, कंदमूळं, कुकिंग फॅट यातून मिळेल.

आंबट - पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि पचनासाठी रस बनवण्यासाठी तुम्हाला आंबट रस लिंबू आणि लोचण्यातून मिळेल.

खारट - जेवण पचवण्यासाठी हिमालयन रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ वापरू शकता.

तिखट - शरीरात जमा झालेला प्लाक तोडण्यासाठी जिरे, धणे, हळद, लवंग, तेजपत्ता यातून तिखट मिळेल.

कडू - पोट थंड ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि हळदीतून कडवटपणा मिळेल.

अस्ट्रिंजेंट - जास्त झालेलं पाणी कमी करण्यासाठी आणि पचन रोखण्यासाठी हर्ब्स, डाळी आणि हळदीतून हे मिळेल.

आयुर्वेदिक जेवण

आयुर्वेदिक जेवण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डॉक्टरांनी आयुर्वेदिक जेवणाचं एक उदाहरण दिलं. यासाठी एक धान्य, एक डाळ, काही मसाले, गुड फॅट, मीठ, लिंबू, काही हर्ब्सपासून तयार जेवण जेवू शकता.

काही रहस्य

हळदीमध्ये वर दिलेल्या लिस्टमधील शेवटचे तीन रस असतात. जे कशा एकातून मिळणं अवघड आहे. 

आवळ्यामध्ये ६ पैकी ५ रस असतात, पण याचा वापर थोडा अवघड आहे.

अस्ट्रिंजेंट रसासाठी जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण तो आयुर्वेदिक ताकातून मिळवता येतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य