शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पावसाळ्यात वेगाने वाढत आहे कोरोनाचा धोका; इन्फेक्शन रोखण्यासाठी वापरा 'हा' रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 9:30 AM

जीवघेण्या विषाणूंपासून स्वतःचा बचाव कशाप्रकारे करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यात विषाणूंची वाढ होऊ शकते. त्यामुळे इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज आम्ही तुम्हाला जीवघेण्या विषाणूंपासून स्वतःचा बचाव कशाप्रकारे करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

आरोग्यतंज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज काही प्रमाणात घश्यात कोरोना व्हायरस प्रवेश करत आहे. त्यासाठी आपल्याला कोरोना व्हायरसची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ द्यायचे नाही. जेणेकरून व्हायरस कमकुवत होईल. आयुर्वेदात उल्लेख असलेल्या काही घरगुती उपायांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आहारात काही पदार्थांचे सेवन करायला हवं.

अशा तयार करा काढा

रोज दिवसातून एकदातरी काढा करून प्या. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही काढा पीत असाल तेव्हा गरम असायला हवा. चहाप्रमाणे थोडा थोडा तुम्हाला हा काढा प्यायचा आहे. हळद आणि काळं मीठ एकत्र करून गरम पाणी तयार करा. आणि त्या पाण्याच्या गुळण्या करा. हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील व्हायरसशी वाढ रोखता येऊ शकते. याशिवाय तुमचं श्वसनयंत्र चांगले राहील. 

लवंग, मोठी वेलची, दालचीनी, तुळशीची पानं पाण्यात घालून पाणी उकळून घ्या. त्यात तुम्ही चवीसाठी गुळ किंवा साखर घालू शकता. तयार केलेला काढा दोनवेळा गाळून घ्या आणि प्या. एंटीव्हायरल औषधांऐवजी असा घरगुती काढा प्या. जेणेकरून कोरोनाला लांब ठेवता येईल. 

लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. 

आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर जीवनरक्षकाप्रमाणे आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडत असताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.  त्यानंतर जेव्हाही कधी तुम्ही बाहेरून घरात येता तेव्हा सगळ्यात आधी बाथरूममध्ये जा. अंघोळ करा आणि ते कपडे धुवायला टाका. असं केल्याने तुम्हाला आणि कुटुंबाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तज्ज्ञांच्यामते रात्री झोपण्याआधी तुम्ही या काढ्याचे सेवन केल्यास सुरक्षित राहू शकता. 

दिलासादायक! स्वाइन फ्लू च्या औषधाने होणार कोरोना रुग्णांचे उपचार; संशोधकांचा दावा

प्रायव्हेट पार्ट्सवर तीव्रतेने खाज येण्याची 'ही' असू शकतात कारणं; 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स