शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 9:41 AM

ल्यूकेमिया हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात.

(Image Credit : Everyday Health)

ल्यूकेमिया हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात. जर योग्य वेळेवर ल्यूकेमियाच्या लक्षणांची माहिती मिळाली नाही तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो. दरवर्षी जवळपास १० लाख लोग ल्यूकेमियाचे शिकार होतात. आता ल्यूकेमिया कोणत्या प्रकारचा आहे, हे कॅन्सरचं रूप घेणाऱ्या रक्तपेशींच्या प्रकारावर अवलंबून असतं. या आजाराची काही लक्षणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वेळीच सावध होऊ शकता.

थकवा जाणवणे

(Image Credit : Talkspace)

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा झोप पूर्ण झाल्यावरही तुमच्या शरीरात जीव नसल्यासारखं जाणवत असेल आणि उठू शकत नसाल तर ही धोक्याची घंटा आहे. अशावेळी याकडे जराही दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थकवा आणि कमजोरी तेव्हाच जाणवते जेव्हा तुमच्या शरीरात रक्त कमी होतं. रक्ताची कमतरता होण्याला अनीमिया असंही म्हटलं जातं.

आपोआप जखम होणे

कोणतीही फिजिकल इंजरी न होता जखम होणे किंवा शरीराच्या एखाद्या भागावर काळे किंवा निळे डाग पडले असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यासोबतच जखम भरण्यास अधिक वेळ लागत असेल तर हे ल्यकेमियाचं लक्षण असू शकतं.

डोकेदुखी

(Image Credit : Organic Facts)

जर सतत डोकेदुखी होत असेल हे न्यूकेमियाचं लक्षण असू शकतं. तसेच डोक्यात होणाऱ्या ब्लीडिंगकडेही इशारा करतं.

रात्री अचानक घाम येणे

(Image Credit : Healthline)

जर रात्री झोपताना तुम्हाला अचानक घाम येत असेल तर याबाबत डॉक्टरांशी बोला. अशाप्रकारे अचानक घाम येणे सामान्य बाब नाही. सामान्यपणे हे अशा काही इंन्फेक्शनमुळे होतं, ज्यांचा थेट संबंध ल्यूकेमियाशी असतो.

हिरड्यांमध्ये सूज

(Image Credit : Hospital Dental Group)

हिरड्यांमध्ये सूज ही नेहमीच तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने होते. तसेच हे ल्यूकेमियाचं लक्षण सुद्धा आहे. सतत हिरड्यांमध्ये सूज होत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ताप

हा आजार झाल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होऊ लागते. त्यामुळे ताप येणे, सर्दी-खोकला होणे या समस्या होत राहतात.

श्वास घेण्यास त्रास

अधिक थकवा आणि कमजोरीमुळे शरीरावर आध्यात्मिक प्रेशर पडतं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. आणि व्यक्ती लवकर लवकर श्वास घेऊ लागतो. थोड्या पायऱ्या चढल्यातरी दम लागतो.

ब्लॉटिंग

जर स्पलीनची साइज वाढली तर हे क्रॉनिक किंवा एक्यूट ल्यूकेमियाचं लक्षण असू शकतं. स्पलीनची साइज वाढल्याने भूक सुद्धा कमी लागते.

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स