शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
3
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
4
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
5
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
6
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
7
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
8
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
9
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
10
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
11
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
12
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
13
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
14
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
15
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
16
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
17
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
18
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
19
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढला! हवेतूनही १८ फुटांपर्यंत होऊ शकतो कोरोनाचा प्रसार,'या' लोकांना बसेल जास्त फटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 14:20 IST

शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून १८ फुटांपर्यंत व्हायरस पसरू शकतो.

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील देशातील शासनांचे प्रयत्न सुरू असून शास्त्रज्ञ लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सोशल डिस्टेंसिंग. सोशल डिस्टेंसिंग म्हणजेच लोकांमध्ये अंतर ठेवणं गरजेंच आहे.  अलिकडे कोरोना व्हायरसचा हवेमार्फत होणारा प्रसार या विषयावर रिसर्च सुरू होता.

यात असं दिसून आलं की, शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून १८ फुटांपर्यंत व्हायरस पसरू शकतो. साइप्रसच्या निकोसिया विद्यापिठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार व्हायरसचं हवेत पसरणं हेच संक्रमणाचं कारण ठरतय का? ही बाब समजणं या संशोधनामुळे शक्य होऊ शकेल.

५ सेकंदात १८ फूटांपर्यंत लाळेचा प्रसार होऊ शकतो.

फिजिक्स ऑफ फ्लूएड यात प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, साधारणपणे  चार किलोमीटर प्रतितास हवा सुरू असेल तर ५ सेकंदात १८ फूटांपर्यंत जाऊ शकते. निकोसिया विद्यापीठाचे प्रोफेसर दिमित्रिस ड्रिक्ककिस  यांनी दिलेल्या माहितीनुसार लाळेचे थेंब वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना संक्रमित करू शकतात.  वयस्कर लोकांना आणि लहान मुलांचा याचा जास्त धोका असतो.

संशोधकानी सांगितले की, लाळ हा तरल पदार्थ खोकण्यातून किंवा शिंकण्यातून हवेत मिसळल्यामुळे लोकांना प्रभावीत करत असतो. या रिसर्चमध्ये दिसून आलं की, हवेत लाळेचे थेंब पसरल्यानंतर तापमान आणि आद्रतेचा प्रभाव पडत असतो. संशोधकांनी खोकणारी किंवा  शिंकणारी व्यक्ती तसंच हवेतील लाळेचे थेंब यांची तपासणी करण्यासाठी एक कंप्यूटर सिमुलेशन  तयार केले आहे. ज्याद्वारे तापमान आणि आद्रता यांचा व्हायरसच्या प्रसारावर कसा परिणाम होतो. याचा अभ्यास केला जाईल. यात १ हजारांपेक्षा जास्त लाळेच्या थेंबांवर रिसर्च करण्यात आला होता. 

CoronaVirus News : पोटातील जंतू मारण्याच्या औषधाने होणार कोरोना नष्ट; तज्ज्ञांचा खुलासा

व्यवस्थित दात घासत नसाल तर कमी होऊ शकते रोगप्रतिकारकशक्ती, 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या