58 of diabetic deaths cause cardiovascular disease you must know the cause of diabetes | 58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं
58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं

(Image Credit : belmarrahealth.com)

सध्या फक्त मोठ्या माणसांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही सर्रास डायबिटीजची लक्षणं आढळून येतात. डायबिटीजमुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात. अशातच द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, टाइप 2 डायबिटीजच्या रूग्णांमध्ये 58 टक्के मृत्यू हे हृदयासंबंधी रोगांमुळे होतात. वृत्तसंस्था एफे से मेक्सिकन डायबिटीज फेडरेशनच्या अध्यक्ष हेक्टर सांचेज मिजंगोस यांनी सांगितले की, या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यू आणि हृदयासंबंधातील आजारांचा धोका असतो. 

काय म्हणतात तज्ज्ञ?

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहामुळे वाढणारं शरीरातील साखरेचं प्रमाण रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचवतं असून यामुळे ब्लड प्रेशर, डोळ्यांचं आरोग्य आणि सांधेदुखीसारख्या इतर समस्याही उद्भवतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (World Health Organization) दिलेल्या आकड्यांनुसार, टाइप 2 डायबिटीजने 44.2 कोटी लोक त्रस्त आहेत. मेक्सिकोतील आरोग्य सचिवालयाने सांगितले की, देशातील 1.3 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यातील फक्त अर्ध्या लोकांनाच माहीत आहे की, त्यांना मधुमेह झाला आहे. मिजंगोस यांच्यानुसार, 2015मध्ये फक्त मेक्सिकोमध्ये 98000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू डायबिटीजने झाला होता आणि मृत्यू होणाऱ्या लोकांचं सरासरी वय 66.7 वर्ष एवढचं होतं. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'ही अत्यंत वाईट गोष्ट असून जर, या लोकांना डायबिटीज नसतं तर हे लोक साधारणतः आणखी 15 वर्षांसाठी जीवंत राहू शकत होते.'

उपचार घेणं आवश्यक 

उपचार प्रणालीमध्ये सुधारणेसाठी मेक्सिकोमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये कॅनाग्फ्लिोजिनचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे. मिंजगोस यांनी सांगितले की, 'या औषधासोबत एक व्यक्ती 100 मिलीग्रॅम साखर प्रतिदिन कमी करू शकतो. ज्यामुळे दररोज 4000 कॅलरी कमी होतात. ज्या वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

हे आहे डायबिटीजचं कारण

जेव्हा आपल्या शरीरातील पॅनक्रियामध्ये इन्सुलिन पोहचणं कमी होतं, त्यावेळी ग्लूकोजचा स्तर वाढतो. या स्थितीला डायबिटीज किंवा मधुमेह असं म्हणतात. इन्सुलिन एक हार्मोन आहे, जे पचन ग्रंथींपासून तयार होतात. याचं काम शरीरातील अन्न एनर्जीमध्ये परावर्तित करण्याचं असतं. याशिवाय हे हार्मोन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात. डायबिटीज असलेल्या व्यक्तींना शरीरातील अन्न एनर्जीमध्ये बदलणं कठिण होतं. या परिस्थितीमध्ये ग्लूकोजचा वाढलेला स्तर शरीराच्या विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो. 

पुरूषांना असतो अधिक धोका

डायबिटीजची लक्षणं महिलांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त आढळून येतात. मधुमेह जास्तीत जास्त आनुवांशिक आणि अनियमित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. यामध्ये आनुवांशिकतेमुळे टाइप-1 आणि अनियमित जीवनशैलीमुळे टाइप-2 डायबिटीज असं डायबिटीजचं दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. पहिल्या श्रेणीमध्ये तया व्यक्ती येतात ज्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडिल, आजी-आजोबा यांच्यापैकी कोणाला डायबिटीज असेल तर कुटुंबातील सदस्यांमध्ये हा आजार होणाची शक्यता वाढते. याव्यतिरिक्त जर तुम्ही कमी शरीरिक श्रम, अपूर्ण झोप, अनियमित खाणं, गोड पदार्थ आणि फास्टफूडचा आहारामध्ये जास्त समावेश करत असाल तर तुमच्यामध्ये डायबिटीजचा धोका आणखी वाढतो. 


Web Title: 58 of diabetic deaths cause cardiovascular disease you must know the cause of diabetes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.