डायबिटीसच्या रूग्णांसाठी संजीवनी आहे 'या' आयुर्वेदिक गोष्टी, मिळतील बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:37 AM2024-03-19T10:37:07+5:302024-03-19T10:39:24+5:30

Diabets : आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे डायबिटीसमध्ये रामबाण उपाय ठरतात.

5 ayurvedic herbs and plants to control high blood sugar in diabetes | डायबिटीसच्या रूग्णांसाठी संजीवनी आहे 'या' आयुर्वेदिक गोष्टी, मिळतील बरेच फायदे

डायबिटीसच्या रूग्णांसाठी संजीवनी आहे 'या' आयुर्वेदिक गोष्टी, मिळतील बरेच फायदे

Diabets : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी जडीबुडी आणि आयुर्वेदिक औषधं फार फायदेशीर मानले जातात. कारण या नॅचरल पद्धतीने ग्लूकोज लेव्हल नियमित करण्यास मदत मिळते. अशात आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे डायबिटीसमध्ये रामबाण उपाय ठरतात.

कडूलिंब

कडूलिंब अनेक आजारांवर औषध म्हणून वापरला जातो. यात असलेले बायोअ‍ॅक्टिव तत्व अ‍ॅंटी डायबिटीक इफेक्ट करतात. याने इन्सुलिन सेंसिटिविटी वाढते आणि सेल्सना ग्लूकोज एब्जोर्व करण्यास मदत मिळते. कडूलिंबाच्या पानांचं किंवा रसाचं सेवन केल्यास डायबिटीससंबंधी समस्या कमी करण्यास आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत मिळते.

दालचीनी

आपल्या टेस्टशिवाय दालचीनी ब्लड शुगर कंट्रोल करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. जर्नल ऑफ ट्रेडिशनल अ‍ॅंड कॉम्प्लिमेंट्री मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दालचीनी इन्सुलिन सेंसिटिविटी वाढवण्यासाठी आणि पोट रिकामं असताना ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते. आपल्या जेवणात आणि ड्रिंक्समध्ये दालचीनी टाकून सेवन केल्यास ब्लड ग्लूकोज सामान्य ठेवण्यास मदत मिळते.

हळद

हळद आपल्या चमकदार रंगासाठी आणि औषधी गुणांसाठी ओळखली जाते. करक्यूमिन हळदीमध्ये आढळणारं एक पॉवरफूल कंपाउंड आहे जे अॅंटी डायबिटीक आणि अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी इफेक्ट्ससाठी ओळखली जाते. एका रिपोर्टनुसार, करक्यूमिन इन्सुलिन रेजिस्टेस आणि ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते. 

मेथी

मेथीमध्ये आरोग्याला मिळणारे अनेक फायदे असतात. ज्यात एक ब्लड शुगर नियंत्रित करण्याची क्षमता आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये सॉल्यूबल फायबर आणि ट्रायगोनेलाइन सारखे पदार्थ आढळतात. जे इन्सुलिन सेंसिटिविटी वाढवतात आणि ग्लूकोजचं मेटाबॉलिज्म कंट्रोल करू शकतात. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा. ते खाल्ल्याने ब्लड ग्लूकोज नियंत्रित केलं जाऊ शकतं.

आवळा

आवळा अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरला जातो. आवळा आपल्या पावरफुल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि हाय व्हिटॅमिन सी मुळे फार फायदेशीर मानला जातो. या सुपरफूडने ब्लड ग्लूकोज कमी केलं जाऊ शकतं. आवळा तुम्ही कच्चा खाऊ शकता, त्याच्या पावडरचा वापर करू शकता.

Web Title: 5 ayurvedic herbs and plants to control high blood sugar in diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.