दररोज फक्त 15 मिनिटं करा जॉगिंग; डिप्रेशनची समस्या होइल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 04:00 PM2019-03-01T16:00:38+5:302019-03-01T16:03:23+5:30

सध्या व्यस्त जीवनामध्ये आपण स्वतःसाठी वेळ देवू शकत नाही. अभ्यासाचं प्रेशर, ऑफिसमधील कामाचं टेन्शन यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा डिप्रेशन किंवा तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

15 minutes jogging in a day can lower the risk of depression says research | दररोज फक्त 15 मिनिटं करा जॉगिंग; डिप्रेशनची समस्या होइल दूर!

दररोज फक्त 15 मिनिटं करा जॉगिंग; डिप्रेशनची समस्या होइल दूर!

सध्या व्यस्त जीवनामध्ये आपण स्वतःसाठी वेळ देवू शकत नाही. अभ्यासाचं प्रेशर, ऑफिसमधील कामाचं टेन्शन यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा डिप्रेशन किंवा तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यानंतर डिप्रेशनपासून सुटका करण्यासाठी विविध औषधांचं सेवन करणं आवश्यक असतं. पण तुम्हाला माहीत आहे का? आता डिप्रेशनपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला औषधांचं सेवन करण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, औषधांऐवजी जर तुम्ही फक्त 15 मिनिटांसाठी जॉगिंग केलतं तर शारीरिक व्यायामासोबतच डिप्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होते. 

मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटलतर्फे एक रिसर्च करण्यात आला होता. ज्यामधून असं समजलं आहे की, जर आपण फक्त 15 मिनिटांसाठी जॉगिंग केले तर डिप्रेशन होण्याचा धोका अत्यंत कमी असतो. जर तुम्हाला जॉगिंग करण्यासाठी वेळ नसेल तर इतर कोणताही शारीरिक व्यायम करणं फायदेशीर ठरतं. 

संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. डेव्हिड यांनी सांगितल्यानुसार, 'जेव्हाही आमच्याकडे एखादा रूग्ण डिप्रेशनची समस्या घेऊन येतो. त्यावेळी आम्ही त्याला औषधांव्यतिरिक्त थोडं फिरण्याचा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पुढे त्यांनी सांगितले की, 15 मिनिटं जॉगिंग केल्यानंतर किंवा इतर काही शारीरिक काम केल्यानंतर आपला हार्ट रेट 50 टक्के अधिक वेगाने धडधडणं गरजेचं असतं. डेविड याला स्वीट स्पॉट असं म्हणतात. उदाहरणार्थ, एक्सरसाइजआधी जर तुमचा हार्ट रेट 60 असेल तर एक्सरसाइजनंतर तो 90 असणं आवश्यक आहे. 

डिप्रेशनबाबत करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये 6,11,583 लोकांना सहभागी करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक लोकांना एक्सेलेरोमीटर परिधान करण्यात आले होते. त्यापैकी बऱ्याचजणांनी फिजिकल वर्कबाबत सेल्फ रिपोर्टिंगही केलं होतं. या एक्सपरिमेंटमधून हे समजण्यास मदत झाली की, ज्या लोकांनी एक्सेलेरोमीटर वेअर केले होते आणि एक्सरसाइजही केली होती. त्याना डिप्रेशनचा धोका कमी होता. या लोकांच्या तुलनेत ज्यांनी एक्सेलेरोमीटर वेअर केले नव्हते, त्यांच्यामध्ये मात्र डिप्रेशनची लक्षणं दिसून आली होती. संशोधनामध्ये हे स्पष्ट झालं की, मानवाच्या डिएनए (DNA)चा आणि डिप्रेशनचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. 

जर तुमच्या आई-वडिलांना डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की, तुम्हालाही डिप्रेशनच्या समस्येचा त्रास सहन करावा लागेल. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि 15 मिनिटांसाठी जॉगिंग किंवा शारीरिक कामं केली तर तुम्ही डिप्रेशनच्या समस्येपासून तुमची सुटका करून घेऊ शकता. 

सध्या डिप्रेशन हा आजार मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं आहे. अमेरिका, यूनायटेड किंग्डम आणि भारतामधील अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. फक्त अमेरिकेमध्येच 16 मिलियनपेक्षा जास्त लोक डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त आहेत. 

Web Title: 15 minutes jogging in a day can lower the risk of depression says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.