२४ तासात १२ बळी
By Admin | Updated: March 20, 2015 22:39 IST2015-03-20T22:39:59+5:302015-03-20T22:39:59+5:30
राज्यातील स्वाइन फ्लूची स्थिती : ११९ नवे रुग्ण सापडले

२४ तासात १२ बळी
र ज्यातील स्वाइन फ्लूची स्थिती : ११९ नवे रुग्ण सापडलेपुणे : राज्यात गुरूवारी दिवसभरात स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ वर पोहोचली आहे. तर लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे.गेल्या ३-४ दिवसांमध्ये राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र आज पुन्हा लागण झालेल्यांच्या आणि बळी पडलेल्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे अजूनही राज्यातून स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्याचे स्पष्ट होत नाही.गुरूवारी दिवसभरात राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले. लागण झालेले ३६७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यापैकी ३७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.