गोंदिया जिल्ह्यातील जि.प. शाळेची स्लॅब कोसळली; विद्यार्थी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:11 IST2019-03-26T11:11:19+5:302019-03-26T11:11:49+5:30
देवरी तालुक्यातील जि.प. के. आ. वरिष्ठ प्रा. शाळेत मंगळवारी सकाळी वर्ग सुरू असताना १०.१५ च्या सुमारास अचानक छताचा एक मोठा भाग कोसळला.

गोंदिया जिल्ह्यातील जि.प. शाळेची स्लॅब कोसळली; विद्यार्थी सुरक्षित
ठळक मुद्दे१०-१२ वर्षे जुनी इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: देवरी तालुक्यातील जि.प. के. आ. वरिष्ठ प्रा. शाळेत मंगळवारी सकाळी वर्ग सुरू असताना १०.१५ च्या सुमारास अचानक छताचा एक मोठा भाग कोसळला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. विद्यार्थी सुरक्षित आहेत. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची बसण्याची मात्र गैरसोय झाली आहे. शाळेची ही इमारत केवळ १०-१२ वर्षे जुनी आहे. तिचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येते.