झेडपीचे विदर्भवीर येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:31 IST2018-03-31T21:31:35+5:302018-03-31T21:31:56+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

ZP gets Vidarbhaver's help | झेडपीचे विदर्भवीर येणार अडचणीत

झेडपीचे विदर्भवीर येणार अडचणीत

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य : सीईओदेखील लावणार थम्ब

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. या नियमाची काटेकोरपणे अमलबजावणी केली जाणार असून स्वत: सीईओ बायोमेट्रिकवर कार्यालयीन वेळेत थम्ब करणार आहे. या निणर्यामुळे झेडपीच्या विविध विभागाचे विदर्भवीर खातेप्रमुख व कर्मचारी अडचणी येणार आहेत.
शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांना बायोमेट्रिक मशिन्स लावण्याचे निर्देश दिले आहे. या बायोमेट्रीक मशिन्स शासनाच्या एनआयसी या सॉफ्टवेअरशी कनेक्ट असणार आहे. बायोमेट्रिक मशिन्समध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजिस्टेशन व थम्ब घेण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक मशिन्स लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.
बायोमेट्रिकमध्ये जि.प.च्या ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या रजिस्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुध्दा येत्या दोन तीन दिवसात पूर्ण होणार आहे. येत्या १ एप्रिलपासून बायोमेट्रिकवर हजेरी लावणे सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले आहे. त्यामुळे जि.प.च्या अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी ९.४५ व सायंकाळी ५.४५ वाजता या कार्यालयीन वेळेत आल्यावर आणि जाताना थम्ब करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी देखील जि.प.मध्ये बायोमेट्रिक मशिन्स लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या शासनाच्या एनआयसी या सॉफ्टवेअरशी कनेक्ट नव्हत्या. शिवाय कुणीच फारसे गांभीर्याने घेत नव्हते. जि.प.चे काही विभागप्रमुख विदर्भ एक्स्प्रेसने येत असल्याने त्यांचे अधिनस्त कर्मचारी सुध्दा त्यांचा कित्ता गिरवित असल्याचे चित्र होते.
त्यामुळे शासकीय कार्यालयांची वेळ जरी सकाळी ९.४५ वाजताची असली तरी ११:३० शिवाय प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नव्हती. ही पंरपरा केवळ जि.प.मध्येच नव्हे तर विविध शासकीय कार्यालयांमध्ये कायम आहे.
त्यामुळे विदर्भ ठरविते गोंदियातील शासकीय कार्यालयांची वेळ असे विनोदाने म्हटले जाऊ लागले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या अपडाऊन संस्कृतीचा फटका शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत होता. मात्र उशीरा का होईना प्रशासनाने याची दखल घेत बायोमेट्रीक हजेरी अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याना गाडीची येण्याजाण्याची वेळ बदलावी लागेल अथवा गोंदिया येथे भाड्याने घर घेवून रहावे लागले.
विशेष म्हणजे नियम केवळ कर्मचाऱ्यानाच का ? वरिष्ठ अधिकाºयांना सूट का दिली जाते असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. त्यामुळे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांनी १ एप्रिलपासून स्वत: नियमित बायामेट्रीकवर हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी सुध्दा याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना विभाग प्रमुखांना केली आहे.
दौरा संस्कृतीला लगाम
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात दौरा दाखवून प्रत्यक्षात दुसरीकडे राहत होते. मात्र आता दौरा संस्कृतीला सुद्धा ब्रेक लागणार आहे. अधिकारी अथवा कर्मचारी ज्या गावाच्या दौºयावर असतील त्या ग्रामपंचायतमधील बायोमेट्रिकवर त्यांना थम करणे अनिवार्य आहे. या थम्बची नोंद एनआयसी या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होणार असून त्यावरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार आहे.
वेतन कपात, सीआरवर नोंद
जि.प.च्या कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्याची नियमित पडताळणी केली जाणार आहे. जे अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेत उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे वेतन कपात व शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: ZP gets Vidarbhaver's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.