एप्रिल महिन्यात होणार जि.प.ची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:23+5:302021-02-05T07:44:23+5:30
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय असून आठ पंचायत समिती असून यात ११३ सदस्य आहेत. यासाठी निवडणूक घेण्याकरीता मतदार ...

एप्रिल महिन्यात होणार जि.प.ची निवडणूक
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय असून आठ पंचायत समिती असून यात ११३ सदस्य आहेत. यासाठी निवडणूक घेण्याकरीता मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने २ फेब्रुवारीला जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय यादी प्रसिध्द करणे ११ फेब्रुवारी, यानंतर ११ ते २२ फेब्रुवारीपर्यंत प्रारुप यादीवर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. ३ मार्चला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिध्द करणे तर १० मार्चला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकानंतर सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागले आहे.
......
नगरपंचायतच्या निवडणुका एकत्रच
जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यांच्या निवडणुका सुध्दा एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.