जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:24+5:302021-01-14T04:24:24+5:30
प्रास्तविकातून पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे यांनी राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद जीवन कार्यावर प्रकाश टाकला. उच्चश्रेणी मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे ...

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ()
प्रास्तविकातून पदवीधर शिक्षक सु.मो.भैसारे यांनी राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद जीवन कार्यावर प्रकाश टाकला. उच्चश्रेणी मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवाजीवर साहसी, स्वाभिमानी वृत्ती निर्माण करून, स्वराज्याविषयीचे प्रेम वृद्धिंगत करून छत्रपती घडविण्यास सुसंस्कारित केल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती व सभ्यता जगासमोर अतिशय प्रभावपूर्ण मांडून आपल्या तत्त्वज्ञानाची जाणीव करून देणारे थोर वक्ते असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची कागणे-ठाकूर यांनी केले, तर आभार अचला कापगते-झोडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोहन नाईक, वामन घरतकर, पुरुषोत्तम गहाणे, जितेंद्र ठवकर, गीता नागोसे, उमा राऊत, मुक्ताई लोदी, सायली अंबाद, कुणाल मानकर, नगमा शहारे, मनिषा चाचेरे, पायल शहारे यांनी सहकार्य केले.