जिल्हा परिषद देणार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

By Admin | Updated: July 27, 2016 02:08 IST2016-07-27T02:08:15+5:302016-07-27T02:08:15+5:30

इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलींचे शाळेतील...

Zilla Parishad has given the scholarship to Savitribai Phule | जिल्हा परिषद देणार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

जिल्हा परिषद देणार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

गोंदिया : इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु केली. सदर योजना इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या नावाने सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येत होती. परंतू ही योजना यावर्षीपासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांनी इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी शिष्यवृती योजनेचे अर्ज आॅनलाईन भरायचे आहेत.

 

Web Title: Zilla Parishad has given the scholarship to Savitribai Phule