युवा नेक्स्टने राबविला ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ उपक्रम
By Admin | Updated: August 17, 2014 23:15 IST2014-08-17T23:15:20+5:302014-08-17T23:15:20+5:30
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. शहरात पायदडी तुडवल्या जात असलेल्या कागदी व

युवा नेक्स्टने राबविला ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ उपक्रम
गोंदिया : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. शहरात पायदडी तुडवल्या जात असलेल्या कागदी व प्लास्टिकच्या झेंड्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी प्रा.सविता बेदरकर, आकृती इव्हेंट्सचे संचालक प्रमोद गुडधे, नेहरू युवा केंद्राचे एच.आर.बोपचे, एन.डी.पारधी, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, लोकमत बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष गार्डनमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. यानंतर गोळा केलेल्या झेंड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना एक निवेदन देण्यात आले. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला मुले हातात झेंडे घेऊन फिरतात. परंतू दुपारी तेच झेंडे इतरत्र पडून दिसतात. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक असल्यामुळे त्याचा योग्य सन्मान राखला जावा. त्यासाठी कागदी आणि प्लॅस्टिकच्या छोट्या झेंड्यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
या उपक्रमासाठी दर्पण वानखेडे, वरुण खंगार, मेधा कटरे, प्रगती लिल्हारे, पेमेश गौतम, मोनिश बिसेन, वैभव मोहधरे, मंगेश धबाले, स्वाती बिसेन, प्रिया सोलंकी, लिना सोलंकी, लकी भोयर, पारल पांडे, गौरव खुटमाटे, यश लामकारे, अविनाश मेश्राम, मिना दीक्षित, धिरज डोहारे, सुनील डोंगरवार आदींनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)