शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

युवकांनी स्वत:ला मर्यादित ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:19 IST

युवकांनी स्वत:ला मर्यादीत न ठेवता आलेल्या संधीचे सोने करावे.स्पर्धेच्या युगात युवकांना रोजगाराची संधी मिळेल ती हातून जाऊ देऊ नये, अन्यथा माझे जे स्वप्न आहे, मला जे हवयं ते मिळाल्याशिवाय मी दुसरी नोकरी करणारच नाही अशा दृष्टिकोन असणाऱ्या युवकांना नंतर पश्चाताप किंवा मनस्तापाला सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देविनिता शाहू : पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : युवकांनी स्वत:ला मर्यादीत न ठेवता आलेल्या संधीचे सोने करावे.स्पर्धेच्या युगात युवकांना रोजगाराची संधी मिळेल ती हातून जाऊ देऊ नये, अन्यथा माझे जे स्वप्न आहे, मला जे हवयं ते मिळाल्याशिवाय मी दुसरी नोकरी करणारच नाही अशा दृष्टिकोन असणाऱ्या युवकांना नंतर पश्चाताप किंवा मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य करिअरचे नियोजन करुन यशाचे शिखर गाठावे असा सल्ला पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी दिला.तिरोडा विद्युत प्रकल्पाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर पोलीस उपअधीक्षक नितीन यादव, स्टेशन हेड सी.पी. साहू, अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर उपस्थित होते. सी.पी.साहू यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना सकारात्मक दृष्टीकोण व ध्येय निश्चितीच्या जोरावर जे हवय ते प्राप्त करता येते व त्यासाठी संयम ठेवित निरंतर प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवकांच्या भविष्यासाठी अदानी फाऊंडेशन विविध उपक्रम राबवित असून यापुढे ही आमचे प्रयत्न आम्ही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.प्रास्ताविक अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून युवकांना पोलीस व सैन्य भरतीकरिता आवश्यक असणारी तयारी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जात आहे. दररोज सकाळी दोन तास मैदानावर शारीरिक तयारी, आठवड्यातून दोन दिवस थेअरी क्लास व प्रत्येक शनिवारी १०० मार्काचा पेपर अशी संपूर्ण तयारी चार महिन्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांकडून करुन घेण्यात आली. यासाठी गोंदिया पोलीस विभाग सुद्धा सहकार्य करीत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी विनीता शाहू व सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.संचालन अदानी फाऊंडेशनचे राहूल शेजव तर आभार प्रिती उके यांनी मानले.कार्यक्रमासाठी सुरक्षा विभागाचे गजेंद्र शेखावत, पोलीस विभागाचे वसीम खान, अख्तर शेख, प्रशांत कावळे, अर्शद पठान व अदानी फाऊंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Policeपोलिस