गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:56 IST2020-07-13T19:56:05+5:302020-07-13T19:56:29+5:30

घरची गुरे चारण्याकरिता समीर मित्रांसमवेत चोरखमारा जलाशय परिसरात गेला असताना दुपारी गुरे पाण्यात शिरली. गुरांना पाण्याबाहेर काढण्यासाठी समीर पाण्यात गेला तो पाण्यात बुडाल्या नंतर पाण्यावरच आलाच नाही.

Youth drowns in lake in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गुरे चारण्याकरिता गेलेल्या युवकाचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि 13) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
समीर मिताराम पटले(19) रा. भजेपार असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घरची गुरे चारण्याकरिता समीर मित्रांसमवेत चोरखमारा जलाशय परिसरात गेला असताना दुपारी गुरे पाण्यात शिरली. गुरांना पाण्याबाहेर काढण्यासाठी समीर पाण्यात गेला तो पाण्यात बुडाल्या नंतर पाण्यावरच आलाच नाही. त्यामुळे सोबतच्या मित्रांनी घटनेची माहिती भजेपार गावात दिली.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जलाशयाकडे धाव घेतली. समीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून शव शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दमाळे यांचे मार्गदर्शन खाली पोलीस नायक संजू बांते व सहकारी करीत आहेत.

Web Title: Youth drowns in lake in Gondia district

टॅग्स :Deathमृत्यू