गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात
By अंकुश गुंडावार | Updated: May 6, 2023 17:10 IST2023-05-06T17:09:08+5:302023-05-06T17:10:56+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात
अंकुश गुंडावार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. संदीप माताप्रसाद पगरवार (२६) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
संदीप हा त्याच्या आईला सोडण्यासाठी शुक्रवारी (दि.५) गोंदियाला गेला होता. तो शनिवारी सकाळी ९ वाजता गोंदियाहून खैरलांजी येथे परत आला. घरात कुणी ही नव्हते. लहान भाऊ तिरोडा येथे कॉलेजमध्ये गेला होता. दरम्यान संदीपने घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. दवनीवाडा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आला. संदीपच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.