पांगळी जलाशयात तरुणाचा मृतदेह आढळला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST2021-05-07T04:30:29+5:302021-05-07T04:30:29+5:30
गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांगळी जलाशयात एका २१ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस ...

पांगळी जलाशयात तरुणाचा मृतदेह आढळला ()
गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांगळी जलाशयात एका २१ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्याचा घातपात की अपघात, ही बाब स्पष्ट झाली नाही. त्याचा अज्ञात आरोपींनी खून केला असावा, असा कयास लावला जात आहे. कुणाल संजय तिघारे (२१) रा. कुडवा असे मृताचे नाव आहे. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याची तक्रार राम नगर पोलीस ठाण्यात दिली होती. गुरुवारी (दि.६) रोजी सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह गोंदिया शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या पांगडी जलाशयात आढळला. गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, राम नगरचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.