शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:12 IST

प्रकाश आंबेडकर : अर्जुनी-मोरगाव येथे आयोजित सभेत केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अकोला येथील योगेंद्र यादव यांच्या सभेत झालेला गोंधळ म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी व आयोजकांनी आपसात केलेली हाणामारी आहे. यात त्यांच्याच एका अन्सारी कुरेशी नावाच्या कार्यकर्त्याच्या नाकाचे हाड मोडले असून, ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या प्रकरणात यादव यांच्या कुणाही कार्यकर्त्याला काही काहीही इजा झाली नाही. त्यामुळे त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथे मंगळवारी (दि. २२) आयोजित जाहीर सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची बाजू मांडली. 'हा आमच्यावर नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला आहे,' अशी टीका 'भारत जोडो' अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी अकोल्यात केली होती. 

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असेल तर त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर लाजिरवाणी वेळ आणली,' असेदेखील ते म्हणाले होते. यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बनसोड, राजू राहुलकर, विनोद मेश्राम, दिनेश पंचभाई आदी उपस्थित होते. 

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणारअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या दिवसांत उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर जातील, असे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्या की ते पुढचे पाच वर्षे तुमच्यासोबत राहतील, असे मुस्लिम समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसला सांगितले जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Yogendra Yadavयोगेंद्र यादवPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरgondiya-acगोंदिया