यशवंतग्राम झाले खड्डेमय
By Admin | Updated: August 8, 2015 01:58 IST2015-08-08T01:58:26+5:302015-08-08T01:58:26+5:30
लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे.

यशवंतग्राम झाले खड्डेमय
नागरिक त्रस्त : खड्डे व चिखलमय रस्ते
आमगाव : लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे. चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना पादचारी व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रिसामा ग्रामपंचायतमधील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. जि.प.च्या बांधकाम विभागाने तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेल्या या रस्त्याची मुदत आता संपली असल्याने या रस्त्यांवर पुनर्डांबरीकरण किंवा रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने रस्त्यांवर डबके साचले आहेत.
ग्रामपंचायतने खड्डेमय रस्त्यांवर मुरूमाचे थर टाकण्याची लगीनघाई केली. पावसामुळे सदर रस्ते चिखलमय झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)
दत्तक घेऊनही दुरवस्था
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी गाव विकासासाठी रिसामा गाव दत्तक घेतले होते. परंतु गावातील विकासाचा प्रयत्न होताना दिसत नाही. या दत्तक गावांची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्त्यांची दुरावस्था कायम आहे.