शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: May 13, 2017 01:43 IST

सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत

इशरत शेख : कायदेविषयक साक्षरता जनजागृती कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सर्वांना न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समित्यामार्फत मोफत विधी सहाय दिले जाते. कामगारांनी सुध्दा विधी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सदस्य सचिव इशरत शेख यांनी केले. तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट मध्ये आयोजित कायदेविषयक सारक्षता जनजागृती कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तिरोडा येथील न्या.आर.एस.पाजनकर, न्या.ए.बी.तहसीलदार, न्या. आर.डी.भुयारकर, न्या.पी.सी.बच्छेले, न्या.व्ही.पी.खंडारे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.टी.बी.कटरे, अ‍ॅड.जे.एल.परमार, अ‍ॅड.बोंबार्डे, अ‍ॅ्रड.वाय.एस.हरिणखेडे, संजय अरगडे, एच.आर.प्रमुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शेख यांनी, कार्यक्र मात उपस्थित प्रत्येकाने तसेच ज्यांना कामगारांच्या हिताच्या कायदयाबाबतचे ज्ञान आहे त्यांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांना विधी सेवेबाबतची माहिती दयावी, जेणेकरु न कामगारांना त्यांच्या हिताचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेता येईल असे सांगीतले. न्या.तहसीलदार यांनी, कामगारांच्या हिताच्या विविध कायद्यांवर आधारित माहिती दिली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.कटरे यांनी, कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रि येबाबत माहिती दिली. अ‍ॅड.परमार यांनी, कामगारांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे निर्माण करण्यात आल्याचे सांगितले. अ‍ॅड.बोंबार्डे यांनी, कामगार व कंपनी मालक यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे, जेणेकरु न दोघांचेही हित साध्य होईल असे सांगितले. अदानी पॉवर प्लांटचे मुख्य व्यवस्थापक एस.के.मित्रा यांनी अदानी प्लांटमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार तसेच वेळोवेळी येणाऱ्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक योजनांचा लाभ दिला जातो. तसेच नुकसान भरपाई, मोफत वैद्यकीय तपासणी व इतर लाभ दिले जातात असे सांगितले. यावेळी अ‍ॅड.बढे यांनीही मार्गदर्शन केले. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर.एस.पाजणकर यांनी, कामगारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, तर भारतीय संविधानाचे वचन पूर्ण होईल. कामगारांवर अन्याय होत असेल तर त्यांनी नक्कीच न्यायालयात दाद मागायला पाहिजे. कामगारांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करु न देणे हे विधी सेवा संस्थांची जबाबदारी आहे असे प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्र माला अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. एम.आर.रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार न्या.व्ही.पी.खंडारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तिरोडा येथील दिवाणी न्यायालयात व अदानी प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.