शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:58 IST2017-12-20T23:58:18+5:302017-12-20T23:58:29+5:30

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये जावून सभासद नोंदणीे करण्याचे व शेतकºयांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यर्त्यांना जैन यांनी केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापूरे, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, माजी जि.प. उपाध्यक्ष छाया चव्हाण, किसान सभेचे महासचिव एफ.आर.टी. शहा, माजी जि.प. सदस्य नरेश भेंडारकर, रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, आस्तिक परशुरामकर, भोलानाथ कापगते यांनी मार्गदर्शन केले.
संचालन तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार यांनी केले आणि आभार मिथून मेश्राम यांनी मानले.