कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST2021-06-27T04:19:57+5:302021-06-27T04:19:57+5:30

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या जनभावनेशी जुळलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारे शासनाच्या गोरगरिबांना घरकुल, शेतकऱ्यांना ...

Workers are the backbone of the party () | कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा ()

कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा ()

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या जनभावनेशी जुळलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारे शासनाच्या गोरगरिबांना घरकुल, शेतकऱ्यांना उपयोगी कृषी योजना, कामगार हिताची कामे यांसारख्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवाल तरच जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहील. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले.

गोंदिया शहरातील व्ही. व्ही. लॉन, अंगूर बगीचा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, बालकृष्ण पटले, रमेश गौतम, केतन तूरकर, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक, रमन उके, शिवलाल नेवारे, राजू एन. जैन, विनोद मेश्राम, सौरभ गौतम, राजेश परिहार, गुड्डू मिश्रा, संदीप पटले उपस्थित होते. जैन यांनी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षसंघटनेची कामे करावीत व तळागळातील लोकांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Workers are the backbone of the party ()