मतदार जागृतीचे कार्य काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:18+5:302021-02-05T07:44:18+5:30
गोेंदिया : भारतीय संविधानाने वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. राजकीय अधिकारात मतदानाचा अधिकार सर्वात ...

मतदार जागृतीचे कार्य काळाची गरज
गोेंदिया : भारतीय संविधानाने वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. राजकीय अधिकारात मतदानाचा अधिकार सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार आहे. आपले शासक व प्रतिनिधी निवडण्याची संधी या अधिकारामुळे प्राप्त होते. म्हणून या मतदानाचे महत्त्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. सुशील पालीवाल यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी अंतर्गत पदवीव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती या विषयावर घेण्यात आलेल्या स्लोगन स्पर्धेेचे परीक्षक म्हणून ते बोलत होते. २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदार जागृतीसाठी यादिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या आयक्यूएसी अंतर्गत पदवीव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांना मतदानाबद्दल माहिती व्हावी, मतदानाचे महत्त्व कळावे, यातून सक्षम भारत घडण्यास मदत व्हावी, या विविध दृष्टीने मतदार जागृती स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. पालीवाल व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ प्रा. मनोज पटले यांनी स्लोगन स्पर्धेचे परीक्षण केले. आशयपूर्ण लिखान, स्वच्छ अक्षर आणि चांगली सजावट या तीन विभागात स्लोगन स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. यात बीए अंतिम वर्गाची विद्यार्थिनी संजना परसे हिने प्रथम, बीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सुप्रिया मेश्राम द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक बीए प्रथम वर्षाची गजाला शेख हिने पटकाविला. स्लोगन स्पर्धेतील विजेत्यांचे एनएमडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. शारदा महाजन यांच्यासह प्राध्यापकवृदांनी कौतुक केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे डाॅ. एच. पी. पारधी, डाॅ. के. बी. वासनिक, डाॅ.एस. जे. चौरे व प्रा.घनशाम गेडेकर यांनी सहकार्य केले.