क्रीडा संकुलाचे काम थंडबस्त्यात
By Admin | Updated: February 4, 2015 23:17 IST2015-02-04T23:17:55+5:302015-02-04T23:17:55+5:30
मागील चार महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. शासकीय अधिकारी व संकुल तयार करणारे कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या

क्रीडा संकुलाचे काम थंडबस्त्यात
गोंदिया : मागील चार महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी तयार होणाऱ्या क्रीडा संकुलाचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. शासकीय अधिकारी व संकुल तयार करणारे कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच सदर काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रीडा संकुलाच्या बांधकामास २ जुलै २०१२ रोजी सुरूवात झाली. त्यावेळी सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी १ जुलै २०१४ ठरविण्यात आला होता. सद्यस्थितीत या क्रीडा संकुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम तीव्र गतीने करण्यात आले तर दोन महिन्यांत पूर्ण होवू शकते. क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी सांगितले की ३१ मार्चपर्यंत क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचा आदेश कंत्राटदाराला देण्यात आला आहे.
क्रीडा संकुल तयार करणारे सुपर कंस्ट्रक्शनचे संचालक सुरेश पटले यांनी सांगितले की, संकुलाचे काम निधी न मिळाल्याने थांबलेले आहे. तसेच संकुल कमिटी एकेक खेळांचे काम पूर्ण करा, असे सांगते. मात्र सन २०१२ मध्ये करारनामा करतेवेळी अशी अट ठेवण्यात आली नव्हती.
या नवीन अटीमुळे त्यांना कामात असुविधा होत आहे. जर त्यांना आजच निधी उपलब्ध करून देण्यात आला तर ते ६० दिवसाच काम पूर्ण करून देतील. क्रीडा संकुलाच्या आत पॅव्हेलियन, इंडोर गेम हॉल व स्विमिंग पुलाचे अधिक काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण मैदानात मातीचे लहान-सहान ढेप ठेवलेले आहेत. त्यांना पसरवून धावपट्टी (रनिंग ट्रॅक) व आऊटडोर खेळ मैदान बनविण्यात येणार आहे. विद्युत जोडणी नसल्यामुळे कामांना पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कंत्राटदार व क्रीडा अधिकारी यांच्यात समन्वय असते तर अडचणी आल्या नसत्या. क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी विद्युत जोडणीसाठी ९० लाख रूपये देवूनही क्रीडा समिती व कंत्राटदार यांच्यात समन्वयाची अत्यंत गरज आहे.
क्रीडा संकुलासाठी पर्याप्त निधी असतानाही चार महिन्यांपासून विविध अडचणींमुळे काम रखडले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या कामास सकारात्मक विचाराने गती दिली तर जिल्ह्यातील खेळाडू निश्चितच लाभान्वित होतील. (प्रतिनिधी)