सक्रिय क्षयरूग्ण शोधमोहिमेत समन्वयाने काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:14+5:30
डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घेऊन त्याचा समूळ उपचार करण्यात यावा असे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगीतले.

सक्रिय क्षयरूग्ण शोधमोहिमेत समन्वयाने काम करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कुष्ठरूग्ण, क्षयरूग्ण व असांसर्गीक आजार शोध मोहीम जागरूकता अभियान १२ ते २८ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. सर्व यंत्रणांनी हे काम समन्वयाने करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात १४ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा समन्वयक समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. भूषण रामटेके, डॉ. हिंमत मेश्राम, डॉ. मनोज राऊत, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घेऊन त्याचा समूळ उपचार करण्यात यावा असे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा कुष्ठरोग संचालक डॉ. आर.जे. पराडकर यांनी या कार्यक्रमात येणाऱ्या अडचणीसंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व आशा संपावर असल्यामुळे स्वयंसेवकांची कमतरता निर्माण झाली आहे. या अभियानासाढी बाह्यस्त्रोतांची मदत घेतली जाणार आहे. खासगी-शासकीय नर्सिंग शाळेतील विद्यार्थी, डीएमएलटी शाळेतील विद्यार्थी, आरोग्य सखी, आरोग्य संगीनी, जलसुरक्षा प्रकल्पाचे पुरूष कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली.