रंगीत मतदार ओळखपत्रांचे काम मंद गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:14 IST2019-02-07T21:14:16+5:302019-02-07T21:14:48+5:30
मतदार यांद्यामध्ये रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिले होते. यामाध्यमातून मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र तयार करुन देण्याचा शासनाचा मानस होता.

रंगीत मतदार ओळखपत्रांचे काम मंद गतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मतदार यांद्यामध्ये रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिले होते. यामाध्यमातून मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र तयार करुन देण्याचा शासनाचा मानस होता. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही केवळ २५ टक्केच काम पूर्ण झाल्याने या निवडणुकीत मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र मिळणे कठीण आहे.
निवडणूक आयोगाने २००९ मध्ये मतदार याद्यांना रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही या कामाला गती मिळाली नाही. २०१४ पासूनच जिल्ह्यात मतदार याद्यांना रंगीत ओळखपत्र जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात कार्यरत सर्व बीएलओंना या कामाला लावले. मात्र यानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ब्लॅक अॅन्ड व्हाईट छायाचित्र मतदार याद्यांना लावले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात एकूण १२८१ मतदान केंद्र असून तेवढेच बीएलओ कार्यरत आहे. १२८१ बीएलओ यांनी मतदारांच्या घरोघरी जावून मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम केले. मात्र त्यांना बऱ्याच मतदारांकडून रंगीत छायाचित्र मिळाले नाही. पाच वर्षांच्या कालावधीत केवळ २५ टक्के काम झाल्याने निवडणूक विभागाला सुध्दा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
काय आहे अडचण
निवडणूक विभागाने बीएलओ म्हणून ज्यांची नियुक्ती केली आहे. ते सर्व अधिकारी व कर्मचारी आहे.जेव्हा विशेष अभियान राबविले जाते तेव्हा ते आपले काम सोडून निवडणुकीचे काम करतात. या कामासाठी पूर्ववेळ नसल्याने सर्व मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम केवळ २५ टक्के पूर्ण झाल्याचे बोलल्या जाते.
जिल्ह्यात मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम २०१४ पासून सुरू करण्यात आले. मात्र बीएलओनी हे काम योग्य तºहेने न केल्याने केवळ २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- हरिश्चंद्र मडावी, जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया.