महिलांनी जिजाऊ, सावित्री, फातिमा यांच्यापासून प्रेरणा घ्यावी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:20+5:302021-01-14T04:24:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : माँ साहेब जिजाऊ, सवित्रीबाई, फातिमा शेख यांचे नाव घेताच उरात स्वाभिमान निर्माण होतो. राजमाता ...

महिलांनी जिजाऊ, सावित्री, फातिमा यांच्यापासून प्रेरणा घ्यावी ()
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : माँ साहेब जिजाऊ, सवित्रीबाई, फातिमा शेख यांचे नाव घेताच उरात स्वाभिमान निर्माण होतो. राजमाता जिजाऊंनी राजघराण्याचा अभिमान न बाळगता युद्धकला राजनिती यामध्ये आत्मविश्वासाने प्राविण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनितीचे शिक्षण देण्यासाठी झाला. सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी समाजात शिक्षणाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. महिलांनी या सर्वांचा आदर्श बाळगून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन प्रा. दिशा गेडाम यांनी केले.
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक गांधी वार्डातील नागार्जुन बुद्धविहार येथे नागार्जुन बुद्धविहार महिला मंडळ,पाटलीपुत्र बुद्धविहार व संविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. गेडाम बोलत होत्या. यावेळी माधुरी भेलावे, रिना भोंगाडे, करुणा कामथ यांनी महामानवांच्या छायाचित्रांसमोर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. संचालन निलू मोहंती, अंजू वैद्य यांनी केले तर उपस्थितांचे आभार आभा मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमाला नागार्जुन बुद्धविहार मंडळातर्फे छाया सहारे, पंचशीला मेश्राम, रेखा वाहने, मंजू बन्सोड, प्रमिला भालाधरे, उषा बन्सोड, वंदना गणवीर, संगीता बन्सोड, कौशल्या बोरकर, कमला गणवीर, दिवला राऊत, अश्विनी वैद्य, मंगला बोरकर, राजकुमार बागडे, गौतमा चिचखेडे, प्रतिमा रामटेके, संविधान मैत्री संघातर्फे संयोजक अतुल सतदेवे यांनी सहकार्य केले.