महिलांनी केली सिल्लीत दारूबंदी

By Admin | Updated: February 15, 2015 01:20 IST2015-02-15T01:20:29+5:302015-02-15T01:20:29+5:30

तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिल्ली येथे दारूचा महापूर होता. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊन महिला त्रासून गेल्या होत्या.

Women keeli silty liquor | महिलांनी केली सिल्लीत दारूबंदी

महिलांनी केली सिल्लीत दारूबंदी

परसवाडा : तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिल्ली येथे दारूचा महापूर होता. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊन महिला त्रासून गेल्या होत्या. अखेर सिल्लीच्या महिलांनी महिला मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांच्या पुढाकाराने गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला.
महिलांची सभा घेऊन तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वसंत लबडे यांना दारूबंदीबद्दल पत्र दिले. जि.प. सदस्य पंचम बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड.माधुरी रहांगडाले, रुबीना शेख, इंद्रकला रहांगडाले, सरीता चौरसिया, शालू मलेवार प्रामुख्याने उपस्थित होत्या. गावातील शेकडो महिलायुक्त वर्ग नागरिक होते. गावातील अवैध धंद्येवाल्यांना ताकीद देण्यात आली. अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक लबदे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले. अ‍ॅड. रहांगडाले यांनी महिलाना बोधामुक्त पाजून महिलात नविन संजीवनी दिली. दारू पेऊन नागरिक किंवा घरचा मानूस दिसल्यास त्याची करून पोलिसांच्या स्वाधीन करावे, असे मार्गदर्शन केले. यासाठी महिला व मुलींनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: Women keeli silty liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.