शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:55 IST

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

गोंदिया : अनेक दिवस आजारी असलेल्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाला असावा, या संशयावरून पोलिसांनी मृतदेह उकरून काढल्याची घटना तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथे रविवारी (दि. २९) घडली. भारती सुरेंद्र शहारे (४५, रा. दासगाव बुज), असे मृत महिलेचे नाव आहे.

भारती गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. शुक्रवारी (दि. २७) त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी हा आजारपणामुळेच मृत्यू झाला असावा, असे समजून गावातील स्मशानभूमीत दफन विधी करून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, या मृत्यूमागे काहीतरी काळेबेरं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत शनिवारी (दि. २८) मुलाचा शोध घेतला. तसेच रविवारी (दि. २९) पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तालुका दंडाधिकारी समशेर पठाण यांच्या उपस्थितीत मृतदेह उकरून बाहेर काढला. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. 

शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अंडी विकून भरायची पोट- पतीच्या निधनानंतर मुलगा व आई घरी राहायची. परंतु काही दिवसांपासून मुलगाही नागपूरला राहायचा. अधून-मधून तो गावाला येत असे. भारती शहारे गावातच फिंगर आणि अंडी विकून आपले पोट भरायची. मुलगा गावाला आला आणि आईचा मृत्यू झाला. पहिल्या दिवशी तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नातेवाईक व गावकऱ्यांना वाटले. परंतु पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून तिचा खून झाल्याचा दाट संशय बळावला अन् तो मृतदेह उकरून काढला.

- अहवालानंतर ठरेल तपासाची दिशा- भारती शहारे यांचा गावातील स्मशान भूमीत दफनविधी करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तो मृतदेह रविवारी उकरून तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. उत्तरीय तपासणीत तिच्या मृत्यूचे कारण कोणते, हे कळेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस