‘ती’ महिला कोरोना बाधित नव्हेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:13+5:30

सध्या देशभरात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सोशल मीडियावर अफवांचा महापूर आला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.असा काहीसा प्रकार जिल्ह्यात गुरूवारी (दि.१२) घडला. गोंदिया येथे पंधरा दिवसांपूर्वी इजिप्तहून एक महिला परतली.

'That' woman should not interrupt the corona | ‘ती’ महिला कोरोना बाधित नव्हेच

‘ती’ महिला कोरोना बाधित नव्हेच

ठळक मुद्देप्रयोग शाळेच्या अहवालात स्पष्ट । अफवेमुळे जिल्हावासीयांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंधरा दिवसांपूर्वी इजिप्तहून गोंदिया येथे आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याची अफवा जिल्हाभरात दोन दिवसांपूर्वी पसरविण्यात आली. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने याची दखल घेत सदर महिलेच्या लाळ आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत दोन दिवसांपूर्वी पाठविले होते.याचा अहवाल शुक्रवारी (दि.१३) रात्री पात्र झाला असून सदर महिला ही कोरोना बाधीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या देशभरात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सोशल मीडियावर अफवांचा महापूर आला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.असा काहीसा प्रकार जिल्ह्यात गुरूवारी (दि.१२) घडला. गोंदिया येथे पंधरा दिवसांपूर्वी इजिप्तहून एक महिला परतली. यानंतर ही महिला घश्यात त्रास होत असल्याने येथील शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी गेली होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी तिची आरोग्य तपासणी करुन उपचार केले आहे.मात्र काही अज्ञात व्यक्तीने विविध व्हॉटसअ‍ॅप गु्रपवरुन सदर महिला कोरोना बाधीत असल्याचे संदेश टाकले. त्यामुळे जिल्हाभरात हा संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय त्या महिलेला सुध्दा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
अफवेमुळे अखेर आरोग्य विभागाने सदर महिलेच्या लाळेचे आणि रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. याचा अहवाल शुक्रवारी रात्री १० वाजता शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना प्राप्त झाला. सदर महिला ही कोरोना बाधित नसून तिचा रिर्पोट देखील निगेटिव्ह आला. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनाने सदर महिलेला १४ दिवस घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहे.
कोरोना संदर्भात सोशल मीडियावरुन खोट्या अफवा फसरवून लोकांमध्ये दहशत निर्माण करुन नये असे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी म्हटले आहे.

मेडिकलने मागविले दोन लाख मास्क
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या जात आहे.तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य संचालकाकडे दोन लाख मॉस्कची मागणी केली असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी इजिप्तहून गोंदिया येथे परतलेली महिला कोरोना बाधित असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. यानंतर सदर महिलेच्या रक्ताचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोग शाळेकडून अहवाल प्राप्त झाला असून रिर्पोट कोरोना निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना घाबरण्याची काहीच गरज नाही.
- डॉ.व्ही.पी.रुखमोडे,
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: 'That' woman should not interrupt the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.