गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 14:25 IST2021-07-16T14:24:04+5:302021-07-16T14:25:07+5:30

Gondia News कोकणाई कवठा मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.जखमींवर नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Woman killed, five injured in tractor overturn in Gondia district |    गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू, पाच जखमी

   गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू, पाच जखमी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

       गोंदियाः कोकणाई कवठा मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.जखमींवर नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
        नवेगावबांध येथून मजूर घेऊन हा ट्रॅक्टर गोठणगावच्या वामन चांदेवार यांचे शेतात रोवणीसाठी जात होता. त्यात ७ महिला व दोन पुरुष मजूर होते. साडे नऊ वाजताच सुमारास कवठा जंगल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ला मार्ग देत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरची ट्राली उलटली. यात सत्यभामा मनिराम कुंभरे ५५ रा नवेगाव बांध या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाची सून गायत्री अशोक कुंभरे २८ हिचा या अपघातात पाय तुटला. इतर जखमींमध्ये देवांगणा वामन चांदेवार ५०, संगीता मुकेश चाफेकर ४०, विमल सितकुरा बडोले ६०, पंचफुला युवराज साखरे ६५, यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा क्र एम एच ३५ - ८१०५ ट्राली क्र एम एच ३५ डी ८१४० असल्याचे समजते. तहसीलदार विनोद मेश्राम यांनी नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

Web Title: Woman killed, five injured in tractor overturn in Gondia district

टॅग्स :Accidentअपघात